जाहिरात
 
 
 

राज्यात 1 मार्चपासून इलेक्ट्रॉनिक मीटर ऑटोरिक्षांना सक्तीचे

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 01:12(23/02/12)
 
 
 

मुंबई - गेल्या 10 वर्षांच्या विलंबानंतर राज्य सरकारने 1 मार्चपासून नव्या रिक्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर बसवणे सक्तीचे केल्याची अधिसूचना बुधवारी प्रसिद्ध केली आहे. एप्रिल 2012 पासून टप्प्याटप्प्याने जुन्या रिक्षांमधील मीटरचे इलेक्ट्रॉनिक मीटर्समध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. 

राज्याचे परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा व परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. कामगार नेते शरद राव यांनी मात्र आपण या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले. प्रवासी रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्यामुळे आणि फसवणूक करत असल्यामुळे विविध प्रवासी संघटनांकडून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्याची मागणी होत होती. त्यानुसार 1 मार्चनंतर मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये धावणा-या नव्या रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर सक्तीचे करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक  मीटर असल्याशिवाय या रिक्षांना प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र मिळणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत धावणा-या रिक्षांना मे 2012 मध्ये, तर पुण्यासह इतर ‘अ’ वर्ग महानगरपालिकांच्या हद्दीत धावणा-या रिक्षांसाठी 1 जुलैपासून हा निर्णय अमलात येणार आहे. 

इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे रिक्षाचालकांना भुर्दंड पडणार असल्याचे रिक्षा संघटनांच्या नेत्यांचे मत आहे. बंदिस्त टॅक्सीत असे मीटर बसवण्यास हरकत नाही, पण रिक्षा उघड्या असल्यामुळे त्यांच्या मीटरची काळजी कशी घेणार, असा प्रश्न या नेत्यांनी उपस्थित करत ही योजना अव्यवहार्य असल्याचे सांगितले, तर प्रचलित मीटर्समध्ये छेडछाड करून प्रवाशांना गंडवण्याचे प्रकार वाढले असून त्यांना पायबंद करण्यासाठी नवी योजना उपयुक्त ठरेल, असे राज्य सरकारचे मत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment