Home » Maharashtra » Mumbai » Ex Mayor Of Mumbai And Shivsena Leader Dattaji Nalawade Dead

शिवसेनेचे ज्‍येष्‍ठ नेते दत्ताजी नलावडे यांचे दीर्घ आजाराने निधन

वृत्तसंस्‍था | Feb 15, 2013, 11:36AM IST
शिवसेनेचे ज्‍येष्‍ठ नेते दत्ताजी नलावडे यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबई- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ताजी नलावडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

दत्ताजी नलावडे यांच्यावर गेल्या वर्षाभरापासून उपचार सुरु होते. त्‍यांना गेल्‍या वर्षी फेब्रुवारीमध्‍ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्‍यानंतर त्‍यांची प्रकृती अत्‍यवस्‍थच होती. फुफ्फुसांना झालेल्या संसंर्गामुळे नलावडेंना श्वास घेण्यास त्रास होत होता. तब्येत बिघडल्यामुळे रविवारी त्यांना जसलोकमध्ये दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी नलावडे यांच्या जसलोक रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती, मात्र त्यानंतर प्रकृती पुन्हा ढासळली. आज पहाटे एक वाजताच्‍या सुमारास नलावडे यांनी अखेरचा श्वास घेतला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय विश्‍वासू नेत्यांपैकी एक नेते म्हणून दत्ताजी नलावडे ओळखले जात होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनाप्रमुखांसोबतच होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, आमदार रामदास कदम यांनी नलावडेंची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली होती. दत्ताजी नलावडे हे मुंबई महापालिकेचे माजी महापौर होते. शिवाय महाराष्ट्र विधानसभाध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. तसेच 1990 ते 2009 पर्यंत ते वरळी मतदारसंघातून सलग विधानसभेवर निवडून गेले होते.

Email Print
0
Comment