Home » Maharashtra » Mumbai » Former Bar Employee Held In Mumbai Triple Murder Case

मुंबई तिहेरी हत्‍याकांडप्रकरणी हॉटेलच्‍याच जुन्‍या कर्मचा-याला अटक

वृत्तसंस्‍था | Jan 06, 2013, 17:13PM IST
मुंबई तिहेरी हत्‍याकांडप्रकरणी हॉटेलच्‍याच जुन्‍या कर्मचा-याला अटक

मुंबई- विद्याविहार येथील नटराज बारमधील तीन कर्मचा-यांच्‍या हत्‍येप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून हा याच हॉटेलमध्‍ये आधी काम करीत होता. जुन्‍या वादातून त्‍याने तिघंची हत्‍या केल्‍याचे पोलिसांचे म्‍हणणे आहे.

सोनू उर्फ प्रविण असे आरोपीचे नाव आहे. नटराज बारमध्ये काल वॉचमन भरत दळवी (54), वेटर राजा ढोलकिया (30) आणि सफाई कर्मचारी वसंत मुदिरा (33) यांची भोसकून हत्‍या करण्‍यात आली होती. सफाई कर्मचारी दीपक पाटील यांना शनिवारी सकाळी मृतदेह आढळले. पोलिसांनी 24 तासांच्या आत सोनूला अटक केली.

हत्याकांडाचे स्वरुप बघता, एखाद्या जुन्‍या कर्मचा-यानेच हा गुन्‍हा केल्‍याचा संशय व्‍यक्त करण्‍यात आला होता. त्यामुळे हॉटेलच्या सर्व कर्मचा-यांची कसून चौकशी करण्‍यात आली. सर्वांचे बयाण आणि मोबाईलच्‍या लोकेशनवरुन सोनूकडे संशयाची सुई वळली. मृतक त्‍याला नेहमी शिविगाळ करीत असत आणि भांडण करायचे. त्‍यामुळे त्‍यांना मारल्‍याचे सोनुने सांगितले. सध्या सोनूची चौकशी सुरू असून हत्याकांडामागील नेमके कारण त्‍यातून समोर येईल.

Email Print
0
Comment