जाहिरात
 
 
 

मनसेच्‍या उमेदवारांची यादी दोन दिवसांमध्‍ये जाहीर करुः राज ठाकरे

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 15:28(27/01/12)
 
 
 

मुंबईः महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची यादी आज जाहीर होणार नाही, सांगतानाच उद्या किंवा परवा यादी जाहीर करण्‍याची शक्‍यता आहे, असे पक्षाचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले. रविंद्र नाट्य मंदिरात मनसे इच्‍छुकांचा मेळावा घेण्‍यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे गंभीर आणि फटकेबाजी न करता अतिशय दिलखुलास चर्चा केली. उमेदवारांच्‍या मुलाखतींदरम्‍यान आलेले अनुभव सांगताना राज यांनी अतिशय मार्मिक टोलेबाजी केली. यावेळी एक वेगळेच राज ठाकरे सर्वांना पाहायला मिळाले. दिलखुलास भाषण करताना एकच धमाल उडाली. यादीबाबत सांगतानाच बंडखोरीची भीती नसल्‍याचे राज म्‍हणाले. सगळे आपलेच आहे. नाराज न होता पक्षाच्‍या कामाला लागावे, असेही राज यांनी स्‍पष्‍ट केले.

राज ठाकरे म्‍हणाले, वेगवेगळ्या शहरांमध्‍ये गेलो. इच्‍छुकांच्‍या मुलाखती घेतल्‍या. परंतु, आता कुणाला उमेदवारी देऊ असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोणावर अन्‍याय तर होणार नाही ना, असे मला वाटते. म्‍हणून परत एकदा सर्वांना बोलाविले होते. हे अतिशय क्लिष्‍ट काम आहे. कुणाला तिकीट द्यायचे, कुणाला वगळायचे, असे अनेक प्रश्‍न माझ्यासमोर आहे. मी हा एक नविन प्रयोग केला. परंतु, तुमच्‍या घरातील लोक उमेदवारी न मिळाल्‍यावर काय विचार करतील, हा प्रश्‍न मला प्रचंड सतावित आहे, असे राज ठाकरे म्‍हणाले. त्यामुळे ज्‍यांना तिकीट मिळाले नाही, त्‍यांच्‍यासह त्‍यांच्‍या कुटुंबियांची राज ठाकरे यांनी माफी मागितली.

तिकीटे देताना पक्षातील पदाधिका-यांनाच प्राधान्‍य देण्‍यात आल्‍याचे राज ठाकरे यांनी स्‍पष्‍ट केले. परीक्षा घेतल्‍यानंतर अनेक अनुभव आले. अनेकांकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोनही बदलला. परीक्षेमुळे लोकांनी महापालिकांचा अभ्‍यास केला, माहिती घेतली. ही प्रक्रीया केल्‍यामुळेच इच्‍छुकांना जवळून भेटता आले, असे राज ठाकरे म्‍हणाले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
6 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment



Copyright © 2011-12 DB Corp ltd., All Rights Reserved.
Site Powered by I Media Corp. Ltd IMCL, DB Corp Ltd. Enterprise.