जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai >> Mumbai Crime Branch Seeks To Confront Abu Jundal With Kasab ‎

कसाब-जबीला समोरासमोर आणण्याचे प्रयत्न

वृत्तसंस्था | Aug 07, 2012, 02:36AM IST
 
 


मुंबई  - मुंबईवर झालेल्या 2६/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकमेव जिवंत पकडण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाब आणि या हल्ल्याचा मास्टर माइंड जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल या दोघांना चौकशीसाठी एकमेकांसमोर आणण्याची मुंबई पोलिस योजना आखत आहे. 

यासाठी मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप पोलिसांना  काहीही उत्तर मिळाले नाही. मुंबईवर हल्ला होण्याआधी अतिरेकी डेव्हिड हेडली आणि इतर आपण भेटल्याचे जबीने मुंबई पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले आहे. डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात आहे. त्यामुळे जबी खरे सांगत आहे की नाही हे तपासण्यासाठी मुंबई पोलिस या दोघांना समोरासमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  

ज्यावेळी 2६/11 रोजी अतिरेकी मुंबईवर हल्ला करत होते. त्यावेळी  लष्कर-ए तोयबाच्या पाकिस्तानातील कराची येथील केलेल्या कंट्रोल रुममध्ये मी तिथेच होतो असे जबीने चौकशीदरम्यान सांगितले आहे. तसेच  मुंबईतील छाबाड हाऊस या प्रार्थनास्थळामध्ये घुसलेल्या अतिरेक्यांशी बोलत असल्याचे जबीने पोलिसांना सांगितले आहे. मूळ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेला जबीला सौदी अरेबिया येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करून 21 जुलै रोजी मुंबई पोलिसांना त्याचा ताबा देण्यात आला. तसेच जबी हा 13 ऑगस्टपर्यंत  मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात राहणार आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment