जाहिरात
 
 
 

राष्ट्रवादी घालणार कुत्र्यांना आळा; काँग्रेसची ‘एक खिडकी’

 
Source: दिव्य मराठी नेटवर्क   |   Last Updated 06:27(26/01/12)
 
 
 

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वचननामा देताना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकांना तातडीने भेडसावणा-या नागरी प्रश्नांना प्राधान्य देण्याबरोबरच रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. तर पालिकेशी संबंधित कामे लवकर व्हावीत म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये एक खिडकी प्रणाली सुरू करण्याचे वचन कॉँग्रेसने जाहीरनाम्यात दिले.

मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट असल्याने त्यापासून नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना धोका उद्भवतो. मात्र अनेक प्राणिप्रेमी संघटना या कुत्र्यांविरोधात कारवाई करू देत नाहीत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी सगळ्या भटक्या कुत्र्यांसाठी एक गार्डन बनवून पशुवैद्यक तज्ज्ञांकडून त्यांच्यावर देखरेख ठेवू, असे वचन राष्ट्रवादीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिले आहे. पालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करण्यात येईल. मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे महत्त्वाचे आहेच, पण इंग्रजी भाषेचे ज्ञानही तितकेच गरजेचे आहे. पालिकेच्या मराठी शाळेतील मुलांना उत्तम प्रकारे इंग्रजी यावे म्हणून सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जात आहे. तसेच या शाळांची दुरुस्ती, शिक्षकांचा दर्जा सुधारणे आदींचा समावेशही यामध्ये आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये नोकरीवर जाणा-या महिलांच्या लहान मुलांसाठी पाळणाघरे सुरू करू, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने सांगितले.

पारदर्शी कारभाराचा कॉँग्रेसचा दावा

जन्म-मृत्यू दाखला, पाणी, रस्ते, बांधकाम परवानगी अशा अनेक कामांसाठी पालिकेच्या पाय-या झिजवाव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक वॉर्डामध्ये एक खिडकी प्रणाली सुरू करण्यात येईल. तसेच प्रशासन अधिकाधिक पारदर्शक करणे आणि नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित करणे याचा कॉँग्रेसच्या वचननाम्यात समावेश असल्याचे एका मंत्र्याने सांगितले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
4 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment



Copyright © 2011-12 DB Corp ltd., All Rights Reserved.
Site Powered by I Media Corp. Ltd IMCL, DB Corp Ltd. Enterprise.