जाहिरात
Home » Maharashtra » Mumbai » New Indian Pop As Bendict

बेनेडिक्ट यांच्या जागी नवे पोप भारतीय?

सतीश खांबेटे | Feb 15, 2013, 09:36AM IST
बेनेडिक्ट यांच्या जागी नवे पोप भारतीय?

मुंबई- ख्रिश्चनांचे धर्मगुरू पोप बेनेडिक्ट यांनी राजीनामा दिलेला असतानाच त्यांच्या जागी येणारे नवे पोप हे भारतीय असू शकतात, या शक्यतेने अनेक भारतीय लोकांच्या भावना मोहरून आलेल्या आहेत. तसे पाहिले तर ख्रिस्ती धर्माच्या इतिहासात एकाही कृष्णवर्णीय व्यक्तीला आतापर्यंत पोपपद भूषवण्याची संधी मिळालेली नाही. या वेळी ही गोष्ट होऊ शकेल काय, अशी चर्चा सुरू आहे.

संपूर्ण जगभरातील 118 कार्डिनल्स नव्या पोपची निवड करतात. यासाठी जवळजवळ सर्वच कार्डिनल व्हॅटिकन सिटीकडे रवाना झाले आहेत. पोपपदासाठी पात्र ठरू शकतील अशा तीन व्यक्ती सध्या भारतात आहेत. पहिले रांची झारखंड येथील टोलेफॉ टोपो, दुसरे मुंबईचे ओस्वाल्ड ग्रॅशियस आणि तिसरे मलंगेरा परंपरेतले क्लेमिस. यापैकी कोणी खरोखर  पोपपदी विराजमान होऊ शकतील का, हा यक्षप्रश्न आहे. ‘मल्याळा मनोरमा’ या दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार मात्र पोपपदी नियुक्ती होण्याची शक्यता असलेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही. ‘मल्याळा मनोरमा’ने पोपपदाच्या संभाव्य उमेदवारांची प्रसिद्ध केलेली नावे : जोवो ब्रेस डि एविस (ब्राझील), टिमोथी डोलान (अमेरिका), मार्क औलेट (कॅनडा), जी. एन. फ्रांगो रा वासी (इटली), लिओनार्डो (अर्जेंटिना). यामध्ये दोन कृष्णवर्णीय आहेत. लॅटिन अमेरिकन लोकांनाही आपल्या वाट्याला या वेळी पोपपद येईल, अशी आशा आहे.

पोप बेनेडिक्ट 28 फे ब्रुवारीला पद सोडणार आहेत. निवृत्तीनंतर ते एकांतातच राहून लेखन, वाचन आणि प्रार्थना करतील. नवीन पोप 31 मार्चपूर्वी गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशीच्या मोंडी थर्सडेला पदग्रहण करतील आणि पदग्रहणानंतर 12 कार्डिनल्सचे पाय धुतील. नवे पोप कोण, हे कोडे काही दिवसांतच उलगडेल.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
4 + 10

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment