Home » Maharashtra » Mumbai » Odishi's Second Time Cut , 40 Percent Fare Come Down

‘ओडिसी’च्या दरात दुस-यांदा कपात, 40 टक्के भाडे कमी करण्याचा निर्णय

प्रतिनिधी | Feb 18, 2013, 04:18AM IST
‘ओडिसी’च्या दरात दुस-यांदा कपात,  40 टक्के भाडे कमी करण्याचा निर्णय

मुंबई- ‘डेक्कन ओडिसी’ या राजेशाही पर्यटन गाडीच्या दरात आता 40 टक्के कपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने घेतला आहे. मार्च महिन्यापासून सुरू होणा-या डेक्कन ओडिसीच्या फेरीसाठी ही कपात करण्यात आली असून या महिन्यातील ही दुस-यांदा करण्यात आलेली ही दरकपात आहे.

सात दिवस आणि आठ रात्रींच्या या आलिशान सफरीत मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, गोवा अशी सफर घडवली जाते. यापूर्वी जानेवारी महिन्यात झालेल्या सफरीसाठी 25 टक्के कपात करण्यात आली होती.
डेक्कन ओडिसी ही गाडी गेल्या 8 वर्षांपासून तोट्यात आहे. मात्र, या वर्षी रेल्वेने केलेल्या भाड्यातील कपातीमुळे ही रेल्वे थोडीशी फायद्यात आली आहे. या गाडीने गेल्या वर्षी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाला सुमारे 65 लाख रुपयांचा फायदा करून दिला. 2005-06 पासून सुरू असलेल्या या गाडीसाठी प्रत्येक फेरीमागे महामंडळाला सुमारे 52 लाख रुपये रेल्वेला द्यावे लागतात. रेल्वेच्या जादा तिकीटदरामुळे गाडीला कमी प्रतिसाद मिळत होता.

पर्यटक संख्या रोडावली
26/11 च्या हल्ल्यानंतर परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली होती. महामंडळ आणि रेल्वे यांच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू असलेली ही आलिशान गाडी तोट्यात असल्याने ती बंद होण्याची भीती निर्माण झाली होती. चार महिन्यांपूर्वी महामंडळाने या गाडीच्या दराबाबत कमी करण्याचा प्रस्ताव रेल्वेला दिला होता.

Email Print
0
Comment