मुंबई - राज्यातील सहा हजारांहून अधिक टंचाईग्रस्त गावांची वीज तोडू नये, असे आदेश मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी बुधवारी दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर कदम यांनी टंचाईबाबत आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली.
सातारा जिल्ह्यासह सांगली आणि सोलापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, लातूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावे टंचाईग्रस्त आहेत. तिथे पिण्याचे पाणी, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या देण्याचे आदेशही कदम यांनी दिले. दरम्यान, रब्बी हंगामासाठी 4 लाख टन खताचा संरक्षित साठा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.