Home » Maharashtra » Mumbai » Shivsena - Owasi Internal Agreement : Malik

शिवसेना-ओवेसी यांच्यात छुपा समझोता : मलिक

प्रतिनिधी | Feb 15, 2013, 04:47AM IST
शिवसेना-ओवेसी यांच्यात छुपा समझोता : मलिक

मुंबई - ‘शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या स्मारकाला विरोध दाखवून राज ठाकरे यांचा शिवसेनाप्रमुखांच्याही स्मारकाला विरोध करण्याचा डाव आहे,’ असा आरोप राष्‍ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केला. तसेच ‘एमआयएम’चे नेते ओवेसी व शिवसेना यांच्यात छुपा समझोता असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मलिक म्हणाले की, एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची नांदेड येथे सभा आयोजित करण्यामध्ये शिवसेनेचाच हात असल्याचा आरोपही मलिक यांनी केला. शिवसेना व एमआयएम यांचा छुपा समझोता झाला असून औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांचाही त्यामध्ये सहभाग असल्याचे ते म्हणाले. मात्र द्वेष पसरवणा-या कार्यक्रमांना आपला कायम विरोध राहील, असे मलिक म्हणाले.


पवारांचे वेतन निधीसाठी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी एक महिन्याचा पगार 1.57 लाख रुपये राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टला दिला. तसेच पक्षाच्या सर्व खासदार, आमदार, मंत्र्यांनीही आपले पगार ट्रस्टला द्यावेत, असे आवाहन पक्षाचे प्रवक्ते मलिक यांनी केले.

Email Print
0
Comment