जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai >> Trainee Doctor Salary Increase Mumbai

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विद्यावेतनात भरीव वाढ

प्रतिनिधी | May 14, 2012, 05:29AM IST
 
 


मुंबई - राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांध्ये कार्यरत असलेल्या 1600  प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे विद्यावेतन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली. या निर्णयाचा अध्यादेश लवकरच काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ व्हावी यासाठी  ‘मार्ड’ या डॉक्टराच्या संघटनेने सातत्याने आंदोलने केली आहेत. सध्या या डॉक्टरांना 2550 रुपये विद्यावेतन दिले जाते. त्यात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता 6000 रुपये विद्यावेतन मिळणार आल्याची माहिती सावंत यांनी दिली. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी या वैद्यकीय शाखांमधील 1600 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना याचा लाभ होणार असून त्यासाठी सरकारला दरवर्षी सुमारे सहा कोटी 72 लाख रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच काढला जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

अभियांत्रिकीच्या जागा रिक्त

राज्यातील विविध महाविद्यालयात सध्या पदवी अभ्यासक्रमासाठी दीड लाख जागा रिक्त आहेत, तर 27200 जागा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी रिक्त आहेत. या दोन्ही शाखांमध्ये नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्याची आवश्यकता नाही. मात्र, अखिल भारतीय तंत्रविज्ञान परिषदेने मान्यता दिल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता द्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. ‘एनसीआर’ने परवानगी दिल्यास एमएड आणि बीएडच्या महाविद्यालयांनाही परवानगी द्यावी लागेल. त्यामुळे या वर्षी प्राप्त झालेल्या तीनशेहून अधिक महाविद्यालयांच्या प्रस्तावांपैकी काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना परवानगी देण्याचा विचार सुरू असल्याचे सावंत म्हणाले.

नवीन महाविद्यालयांना मंजूरी - राज्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी मिळावी यासाठी दरवर्षी सरकारकडे 300 ते 400 प्रस्ताव दाखल होतात. गेल्या दोन वर्षांत नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली गेलेली नाही. त्यामुळे या वर्षी काही महाविद्यालयांना परवानगी देण्याच्या विचारात सरक ार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment