'पेस्ट कंट्रोल'ने घेतला मुंबईत दोघांचा जीव
दिव्य मराठी वेब टीम | Jul 07, 2012, 14:49PM IST

मुंबई: मुंबईतील वर्सोवा भागात 'पेस्ट कंट्रोल'ने दोन बालकांचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे रेहाब आणि रमीझ या दोघांचा बळी गेला आहे. पाचधारा सोसायटीवर शोककळा पसरली आहे.
वर्सोव्यातील पाचधारा नावाच्या सोसायटीमध्ये राहणार्या चौगुले यांनी घरामध्ये बुधवारी पेस्ट कंट्रोल करुन घेतले होते. परंतु, संध्याकाळी त्यांची मुले घर परतल्यानंतर त्यांनी दारे, खिडक्या लावून एसी सुरु केला. त्यामुळे पेस्ट कंट्रोलमध्ये वापरण्यात आलेला विषारी वायू घरातच पसरला आणि त्याचीच त्यांना बाधा झाली. मुलांना मळमळणे, उलट्यांचा त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवले. परंतू रेहाबला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर रमीझचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





