Home » Maharashtra » Mumbai » Union Agriculture Minister Sharad Pawar Comment On Chiplun Sammelan

बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देण्यास काहीही गैर नाही- शरद पवार

दिव्य मराठी वेब टीम | Jan 07, 2013, 17:40PM IST
बाळासाहेबांचे नाव व्यासपीठाला देण्यास काहीही गैर नाही- शरद पवार
मुंबई: चिपळूणमध्ये भरणार्‍या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यास काहीही गैर नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिली आहे.  कारण बाळासाहेब एक लेखक होते, संपादक होते तसेच ते एक मोठे विचारवंत होते, असेही पवार म्हणाले. तसेच मुस्लिम साहित्यिक हमीद दलवाईंच्या घरातून दिंडी काढण्यात गैर काय? असा सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 

संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेबांचे नाव देण्यास काही हरकत नसल्याचेही पवार म्हणाले. साहित्य संमेलनात जाण्याची इच्छा नाही, परंतु लोकांच्या आग्रहामुळे जावे लागते, असाही टोला पवार यांनी विरोधकांना दिला आहे.  संमेलनातील अनेक कार्यक्रमात साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांची गर्दी जास्त असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
 
दरम्यान,  साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी रद्द करण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला आहे.  मुस्लिम साहित्यिक हमिद दलावईंच्या घरातून निघणा-या दिंडीला मुस्लिम समाजाच्या संघटनांनी केलेल्या विरोधापुढे नमते घेत संयोजन समितीने साहित्य संमेलनाच्या उदघाटनाआधी निघणारी ग्रंथदिंडी रद्द केली आहे.

मुस्लिम लेखकाच्या सन्मानास मुस्लिम समाजाचाच विरोध होत असल्यामुळे विरोध करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी साहित्यीक वर्तूळातून केली जात आहे.

साहित्य संमेलन संयोजन समितीने आता ग्रंथदिंडीऐवजी मिरजोळीतून पर्यावरण दिंडी काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.  दलवाईंच्या साहित्यातून मुस्लिम सामाजाचे विद्रूपीकरण झाल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला आहे. मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यासही मुस्लिम संघटननेने विरोध केला आहे.

तुमचं मत

 

बाळासाहेब एक लेखक होते, संपादक होते तसेच ते एक मोठे विचारवंत होते, असेही पवार म्हणाले.

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 4

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment