जाहिरात
 
 
 

बारावीची परीक्षा: जळगावात कॉपी चालली ‘चुपके- चुपके’

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 09:09(22/02/12)
 
 
 

जळगाव: कॉपीमुक्तीसाठी सार्वजनिक शपथ घेतल्यानंतरही शहरात बारावीच्या पहिल्याच पेपरला काही ठिकाणी कॉपी चालल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यातील एकूण 15 केंद्रांवरील 49 विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले.

यंदा शासनातर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना कॉपीमुक्तीसाठी सार्वजनिक शपथ देण्यात आली होती. त्यामुळे कॉपी होणारच नाही, असे वाटत होते; मात्र कॉपीबहाद्दरांनी जुनाच कित्ता गिरवत अभियानाचे तीनतेरा केले. सकाळी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना कडक पोलिस बंदोबस्तात विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षकांनी सुरुवातीच्या एका तासात बर्‍यापैकी नियंत्रण ठेवले; मात्र कॉपी करणारे विद्यार्थी आणि त्यांना कॉपी पुरविणार्‍या बहाद्दरांनी शक्कल लढवत परीक्षा केंद्रांपर्यंत कॉपी पोहोचविण्याचा प्रताप करूनच दाखविला. काही केंद्रांवर मात्र अगदी ‘स्ट्रीक्ट’ वातावरण असल्यामुळे तेथे कॉपी करणे शक्य झाले नाही. तसेच पुरविणार्‍यांनाही अपयश आल्याने त्यांचा हिरमोड झाला.

नातलगांच्या झुंडी अन् पोलिसांचा बंदोबस्त

परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षार्थीच्या नातलगांनी गर्दी केली होती. पोलिसांनी हटकल्यानंतर काही वेळ शांतता होत होती; मात्र पुन्हा गर्दी ‘जैसे थे’ होत होती. काही परीक्षा केंद्रांवर तर नातलगांच्या त्रासामुळे ‘पोलिसदादा’ हतबल झाल्याचे चित्र दिसून आले.

नूतन मराठा, महाराणा प्रताप महाविद्यालयात ‘चालू द्या!’

नूतन मराठा महाविद्यालय व महाराणा प्रताप विद्यालयात सुरुवातीला ‘चुपके-चुपके’ सुरू असलेल्या कॉपी प्रकाराला शेवटच्या एक तासात चांगलाच जोर आला. परीक्षा केंद्रांच्या खिडकीतून परीक्षार्थी पुस्तकांची पाने खाली टाकत होते. तसेच एकमेकांच्या बाकावर जाऊन पेपर सोडवितानाही ‘दिव्य मराठी’च्या छायाचित्रकारांनी अनेकांना कॅमेर्‍यात कैद केले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment