जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Jalgaon >> Dr. Damani Case Karosiya Not Richable

डॉ. दमाणी प्रकरणातील फिर्यादी करोसिया ‘संपर्कापलीकडे’

प्रतिनिधी | Jul 24, 2012, 09:44AM IST
 
 


जळगाव - गेल्या मंगळवारी उघडकीस आलेल्या जुन्या बीजे मार्केटमधील डॉ. मनीषा दमाणी यांच्या हॉस्पिटलमधील स्त्री जातीच्या अर्भकाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रकरणात फिर्यादी असलेला सफाई कर्मचारी अशोक करोसिया गेल्या तीन दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नसल्याचे आढळून आले आहे. जुने तसेच नवीन बीजे मार्केट परिसरात काही शौचालयात साफसफाईचा मक्ता असलेला करोसिया शुक्रवारपासून या परिसरात फिरकलाच नसल्याचेही समोर आले आहे.



शहरातील जुने बीजे मार्केट परिसरात दुसर्‍या मजल्यावर असलेल्या दमाणी मॅटर्निटी अँण्ड सर्जिकल हॉस्पिटलच्या पाठीमागून येणारा सांडपाण्याचा पाइप खालच्या बाजूस खराब पाण्याच्या चेंबरमध्ये जिथे जोडला आहे त्या जागी दि. 17 रोजी मंगळवारी सकाळी 18 आठवड्यांचे मृत स्त्रीभ्रूण आढळून आले होते. धरणगाव येथील ज्योती कैलास सोनवणे ( वय 34) या महिलेच्या गर्भातून हे अर्भक काढण्यात आले होते. मात्र, योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी डॉ. मनीषा दमाणींसह ज्योती सोनवणे यांचे वडील पंडित चौधरी आणि आई पुष्पा चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या अटकेनंतर जामीनही देण्यात आला आहे. मात्र, एकीकडे डॉक्टर्स अन्यायाचा टाहो फोडीत आंदोलन करीत असताना तपासात प्रमुख भूमिका बजावणारा फिर्यादी सध्या कुठे आहे, याचा पत्ता खुद्द पोलिसांना देखील नसल्यामुळे या प्रकरणातील गूढ आता वाढत चालले आहे. आश्चर्य म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी अजून कुणालाही क्लीन चीट दिलेली नाही किंवा प्रकरणाचा तपासही दमाणींच्या अटकेनंतर पुढे सरकलेला नाही.



पोलिसही अनभिज्ञ

या प्रकरणाची चौकशी करणार्‍या तपासाधिकार्‍यांचे दडपण व तणावामुळे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक इंगवले यांच्याकडे आहे. मात्र, या प्रकरणातील फिर्यादी कुठे आहे? हे अद्याप त्यांनाही माहीत नाही. सोमवारी इंगवले यांच्याशी संपर्क साधला असता ते न्यायालयीन कामासाठी मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादी करोसिया यांच्याशी आपण तीन दिवसांपूर्वी संपर्क साधला होता. सध्या ते कोठे आहेत याची माहिती नसल्याचे इंगवले यांनी सांगितले.



मोबाइल रिसिव्ह करीत नाही

फिर्यादी अशोक करोसिया तीन दिवसांपासून शहरात नाहीत. एका मोठय़ा प्रकरणात फिर्यादी असलेले करोसिया याचा मोबाइल क्रमांक सुरू असतानाही ते सध्या कॉल स्वीकारत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी करोसिया यांच्याशी संपर्क साधण्यासाठी फोन केला असता दुपारी एक वाजेपासून त्याच्या मोबाइलवर रिंग जात होती; मात्र त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. तर सायंकाळी सहा वाजेपासून त्याचा मोबाइल बंद झाला होता. पुन्हा रात्री आठ वाजेपासून रिंग जात होती. मात्र पलीकडून प्रतिसाद मिळत नव्हता.



तीन दिवसांपासून अशोक घरी नाही

अशोक करोसिया माझे बंधू आहेत. ते आमच्या शेजारीच राहतात. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ते घरी काहीही न सांगता निघून गेले आहेत. तीन दिवसात त्यांच्याशी कुटुंबातील कुणाचाही संपर्क होऊ शकलेला नाही. मित्रांचाही अशोक यांच्याशी संपर्क झालेला नाही. सुकलाल करोसिया, फिर्यादी अशोक यांचा भाऊ



 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment