जाहिरात
 
 
 

शासकीय यंत्रणेतील लाचखोरांची संख्या झाली दुप्पट!

 
Source: शेखर जोशी   |   Last Updated 09:30(22/02/12)
 
 
 

जळगाव: नोकरशाहीत बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे लाच मागण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांत दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रारी करणार्‍यांची संख्या चौपट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मागील दोन वर्षांत 36 प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. यावरून भ्रष्टाचाराचा आलेख उंचावल्याचे दिसून येते.

गेल्या काही दिवसांपूर्वीच भडगाव येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. याबाबत राज्यभरात बड्या अधिकार्‍यांचाही पर्दाफाश झाला असला तरी, दिवसेंदिवस लाच घेणारे-देणार्‍यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करूनही लाचलुचपत विभागाचे काम वाढतच आहे. सन 2006 पासून ते आजतागायतची आकडेवारी पाहता, सन 2010 व 2011 या दोन वर्षांत लाच प्रकरणांची संख्या दुपटीने वाढली आहे. यावरून भ्रष्टाचाराचा आलेख उंचावल्याचे स्पष्ट दिसून येते. अलीकडे नागरिकांमध्ये जागृती झाल्यामुळे याबाबत लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी दाखल होत असून, त्यातील अटी-शर्तींत बसणारी प्रकरणेच हाताळली जातात. सन 2006 मध्ये 13, 2007 मध्ये 8, 2008 मध्ये 8, सन 2009 मध्ये 9, सन 2010 मध्ये 20 तर सन 2011 मध्ये 16 प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात आला होता. चालू वर्षात लाच घेण्याची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत.

सर्वच विभागांचा समावेश

शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार एका कार्यालयात नसून, सर्वच विभागांमध्ये आहे. त्यात उपप्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम कार्यालयासह इतर विभागांचा समावेश आहे.

10 जणांनाच शिक्षा

सहा वर्षांत 74 लाच प्रकरणे सापळा रचून उघडकीस आली आहेत; मात्र त्यातील केवळ 10 जणांनाच शिक्षा झाली असून, 39 जण निदरेष सुटले आहेत तर 28 प्रकरणांचा न्यायालयीन कक्षेत निपटारा सुरू आहे. बरीचशी प्रकरणे पुराव्यांअभावी शिक्षेपर्यंत पोहोचत नाहीत. तथापि, लाचलुचपत विभागाने ठोस कारवाईची मागणी केलेली आहे.

सध्या लाचलुचपत विभागावर जबाबदारी वाढली असून, लाच घेणार्‍याप्रमाणेच देणाराही तेवढाच दोषी असतो. याबाबत जनजागृती करूनही पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांमध्ये बदल झालेला नाही; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपेक्षा आता लाचेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारी आल्यास बेहिशोबी मालमत्ता चौकशीचेही अधिकार या विभागाला असतात. एस.एस.देशमुख, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 1

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment