जाहिरात
 
 
 

या अफलातून ‘न्यायदाना’चे सर्मथनच होऊ शकत नाही

 
Source: दीपक पटवे   |   Last Updated 09:44(22/02/12)
 
 
 

जळगाव: घरकुल प्रकरणातील संशयित आरोपींना न्यायालयात नेताना झालेला चप्पल मारण्याचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक असाच आहे. असले प्रकार करण्याची आता फॅशनच आली आहे, असे दिसते. थेट अमेरिकेपासून हा प्रकार सुरू झाला आणि दिल्लीमार्गे आता जळगावपर्यंत आला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध क्षोभ उसळला म्हणून हे कृत्य आपण केल्याचे सर्मथन केंद्रीय मंत्री शरद पवार यांना थापड मारणार्‍या हरविंदर सिंग याने केले होते आणि तशीच भाषा आज पकडलेल्या आरोपीनेही केली आहे. भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे क्षोभ उसळणे हे समजू शकते; पण त्यासाठी अशा प्रकारे कायदा हातात घेऊन आपणच न्यायाधीश असल्याच्या आविर्भावात मारहाणीची ‘शिक्षा’ करणे सर्मथनीय कसे असू शकेल?

जळगावातील घरकुल प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. या तपासात काय-काय निष्पन्न झाले, याची जंत्री न्यायालयात सांगितली जाते म्हणून ती माध्यमांमार्फत सर्वसामान्य जनतेला कळते आहे. ज्या लोकप्रतिनिधींना आपण आपले प्रतिनिधी म्हणून शहराचा कारभार करण्यासाठी पाठवले त्यांनी काय-काय आणि कसे उद्योग केले, हे अनपेक्षित स्वरूपात समोर आल्यानंतर सर्वसामान्य माणसाला चीड येणे स्वाभाविक आहे. ही चीड, झालेला संताप मतदारांनी मतपेटीतून उतरवावा, हेही समजण्यासारखे आहे किंबहुना लोकशाहीत तेच अपेक्षित असते. अर्थात, तो एक वेगळा विषय आहे. त्यासंदर्भात बोलायची ही वेळ नाही आणि भ्रष्टाचाराची चीड आली म्हणून चप्पल मारणे, थापड मारणे ही कृतीही सर्मथनीय नाही. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही स्वरूपात कायदा हातात घेण्याचा अधिकार घटनेने कोणालाही दिलेला नाही, याचे भान सर्वांनीच ठेवण्याची आवश्यकता आहे.

घरकुल योजनेत झालेल्या गैरप्रकारांविषयी सहा वर्षांपूर्वी या शहरात फिर्याद दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. खरे तर ती अधिक चीड आणणारी बाब होती; मात्र जळगावकरांनी त्या दिरंगाईबाबत चीड व्यक्त केल्याचे कधी दिसले नाही. तसेच या प्रकरणाचा तपास का होत नाही? याचा जाब पोलिस यंत्रणेला कधी कोणी विचारला नाही. या यंत्रणेविषयी वाटणारी भीती त्यामागे असू शकते हे एकवेळ समजू शकते; पण गुप्त पद्धतीने होणार्‍या मतदानातूनही त्याचे कधी पडसाद उमटले नाहीत. तसे करण्याऐवजी न्यायालयाच्याच आवारात स्वत: असा ‘न्याय’ करण्याचा प्रयत्न करणे याला केवळ ‘स्टंट’, असेच म्हणावे लागेल. हा विद्रोह नव्हे, दहशतवादच आहे आणि तो खपवून घेता कामा नये.

घरकुल प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. जे काही तपासातून समोर येत आहे ते न्यायालयासमोर ठेवलं जात आहे आणि पुढेही ठेवलं जाणार आहे. ते कितपत योग्य आणि अयोग्य होतं, हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार न्यायालयाचा आहे आणि न्यायालय ते काम चोखपणे बजावेल, याविषयी शंकेला कारण नाही. या प्रक्रियेत कुठेही बाधा येणार नाही हे पाहणं हे जबाबदार नागरिकांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य जळगावकरांनी पार पाडलं पाहिजे. त्यासाठी असल्या कृत्याचे कोणीही सर्मथन करता कामा नये. असल्या प्रकारांमुळे पोलिस यंत्रणेला आणि न्यायव्यवस्थेलाही वेगळेच काम लागू शकते आणि तपासकामात त्याने बाधा येऊ शकते, हे खरे तर क्षोभ उसळला म्हणणार्‍या तरुणाने लक्षात घ्यायला हवे होते. अर्थात, तेवढा विवेक त्याच्या ठायी असता तर असे आततायी कृत्य घडलेच नसते. यापुढेही असे कृत्य कोणाच्या हातून घडणार नाही; स्वत: न्यायदात्याच्या भूमिकेत कोणी येणार नाही याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment