जाहिरात
 
 
 

उमवित 27 फेब्रुवारीपासून ‘टेक्नो इव्होल्युशन’

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 09:13(22/02/12)
 
 
 

जळगाव: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातर्फे 27 ते 29 फेब्रुवारीदरम्यान 17 वी ओपन हाऊस ‘टेक्नो इव्होल्युशन 2012’ या स्पर्धेचे विद्यापीठात आयोजन केले आहे. या उपक्रमात 11 प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाचे ‘दिव्य मराठी’ माध्यम प्रायोजक आहे.

यात विज्ञानसंदर्भातील प्रश्नमंजुषा, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यक्तिमत्व विकास, फॅशन शो, चेस, कॅरम, फ्लॉवर डेकोरेशन, सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा, लेखन निर्मिती, जाहिरात कौशल्य, रांगोळी आदी प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे. लहान मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकतील. डॉ. सतेंद्र मिर्शा आणि डॉ.उज्ज्वल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सहभाग नोंदविण्यासाठी उज्ज्वल चौधरी (8055268552), हिमालय वर्दीकर (9096674739), हरीष अजमेरा (9960189551), अक्षय शिरसाठ (8275710993), ऋषिकेश देसले (8055392660), राहुल काने (8055922012), प्राजक्ता मुळे (9403482083), रार्जशी वसावे (9373342372) आणि धनंजय तायडे (8975653029) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

असे होतील कार्यक्रम

27 फेब्रुवारी- सकाळी 10.30 वाजेपासून उद्घाटन, मान्यवरांचे भाषण, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन, इनडोअर-आऊटडोअर गेम, फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा, रांगोळी, ड्राइंग, स्केचिंग, पेंटिंग स्पर्धा.

28 फेब्रुवारी - सकाळी 9 वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रम, स्कीट, इन्स्ट्रमेंटल वादन, गायन (सोलो ड्युएट, गृप), डान्स (सोलो ड्युएट, गृप), फॅशन शो.

29 फेब्रुवारी - सकाळी 9.30 वाजेपासून लाफ्टर चॅलेंज, एकपात्री अभिनय, मिमिक्री, विज्ञान विषयावरील प्रo्नमंजुषा (सिनिअर, ज्युनिअर), सामान्यज्ञान स्पर्धा (सिनिअर, ज्युनिअर), केमिकल विषयावरील प्रo्नमजूंषा, फिशपॉंड, समारोप व बक्षीस वितरण समारंभ.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
6 + 7

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment