जाहिरात
 
 
 

बँक ऑफ महाराष्ट्रचे गृहकर्ज झाले स्वस्त

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 07:25(22/02/12)
 
 
 

नाशिक: गेल्या वर्षभरापासून महागाई ही सर्वात मोठी समस्या ठरली असून, कर्जाचे वाढते व्याजदर हे त्यातील एक मुख्य कारण ठरले होते.आगामी वर्षात बॅँकांचे व्याजदर कमी होतील, अशी आशा अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत असतानाच सोमवारी बॅँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाने गृहकर्जासाठीच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात केली आहे. यामुळे गृहकर्जाकरिताचे हप्ते फेडणार्‍यांबरोबरच नव्याने गृहकर्ज घेणार्‍यांकरिता दिलासा मिळाला आहे.

मध्यमवर्गीयांना होणार फायदा

बॅँक ऑफ महाराष्ट्रने 25 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठीचा व्याजदर 0.25 टकक्यांनी कमी केला आहे, तर 25 लाखापर्यंतच्या गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कही माफ केले आहे. सेंट्रल बॅँकेनेही 30 लाखांपर्यंतच्या कर्जावर वरीलप्रमाणेच सूट दिली आहे. या दोन्हींचा फायदा 30 लाखांपर्यंत कर्जाची जास्त मागणी असलेल्या, मध्यमवर्गीय ग्राहकांना होणार असल्याचे बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या रिटेल अँसेट शाखेचे मुख्य प्रबंधक शंकर भट यांनी सांगितले.

आमचे दर अगोदरच कमी

एचडीएफसीचे 25 लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जाचे व्याजदर 10.50 टक्के असल्याने त्यात कपात करायचा प्रश्नच नाही. सध्या तरी असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. संदीप कुलकर्णी, व्यवसायप्रमुख, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा

हप्ता कमी व्हायला हवा

मी फ्लोटींग प्रकारात गृहकर्जाचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे कमी झालेल्या व्याजदराचा फायदा मला मिळणार आहे. 0.25 टक्क्याने जरी व्याजदर घटविला तरी ज्या गतीने व्याजदर वाढत गेले त्या तुलनेत तो कमी असून, अजून कपातीची गरज आहे. राहुल घोटेकर, ग्राहक

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
3 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment