जाहिरात
 
 
 

नाशिकचे महापौरपद खुल्या गटासाठी

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 06:31(23/02/12)
 
 
 

नाशिक - महापालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या गटासाठी जाहीर झाल्याने आता ख-या अर्थाने निवडणुकीत घोडेबाजार सुरू होणार आहे. मनसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी प्रमुख दावेदारी केल्याने त्यांना सहाय्य करणा-या अपक्षांसह काही प्रमुख पक्षांमधील अनेकांनी महापौरपदासाठी दावेदारी सुरू केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण महिलांना दिल्याने बुधवारी राज्यातील सहा महापालिकांच्या महापौरपदासाठी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी ही सोडत मंत्रालयामध्ये काढली. नाशिक महापालिकेत 122 नगरसेवकांपैकी मनसेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ म्हणून पुढे आली. यामुळे सत्ता स्थापनेसाठी सर्वप्रथम नाव मनसेचे आले. त्याला खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच नाशिक येथील भेटीदरम्यान पुष्टी जोडल्याने मनसेचे स्थानिक पदाधिकारी तयारीला लागले आहेत. मनसेच्या जोडीला भाजप आल्यास मनसेचे सत्ता समीकरण जुळून येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळातून शक्यता व्यक्त केली जात असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही तशी शक्यता बोलून दाखवित राजकीय क्षेत्रात कधीही काहीही घडू शकते, अशी गुगली टाकल्याने महापौरपदाच्या निवडणुकीचे सर्व राजकीय चित्रच पालटून टाकले आहे. तसे पाहिल्यास अद्याप मनसेसाठी ना भाजपने हो म्हटले आहे, ना राष्ट्रवादीसाठी कॉँग्रेसने हो म्हटले आहे, तरीही सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात असून, शिवसेनेने मात्र यासंदर्भात अद्याप ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशीच भूमिका स्वीकारलेली दिसते आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद आणि ठाणे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला मनसेशिवाय पर्याय नसल्याने नाशिकमधील सत्ता समीकरणे जुळवून आणण्यासाठी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने तटस्थ भूमिका घेतल्याने सेनेला तिथे सत्ता स्थापन करता आली. यामुळे नाशिकसाठी सेना तटस्थ राहून मनसेने केलेल्या सहकार्याची परतफेड करणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे भाजपने कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. प्रमुख पक्ष सोडता सहा अपक्ष, जनराज्य आघाडीचे दोन आणि माकपचे तीन असे 11 उमेदवार होतात. राष्ट्रवादीने या सर्वच उमेदवारांना कॉँग्रेससह सोबत घेतले तरी 46 इतकेच संख्याबळ होते. यामुळे मनसेला भाजप, जनराज्य आणि माकपचा बाहेरून पाठिंबा मिळाल्यास सत्ता स्थापन करण्यासाठीचा मार्ग सहज मोकळा होऊ शकतो. याच अनुषंगाने विचार केल्यास पुणे पॅटर्नचा फंडा नाशिक महापालिकेत एकत्र आल्यास आघाडी, शिवसेना, अपक्ष व इतर पक्ष मिळून राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते.  मनसेला रोखण्यासाठीच दावा : राष्ट्रवादी कॉँग्रेसने जोरदार दावेदारी करीत मनसेचे इंजिन रोखण्याचा पुनश्च एकदा चंग बांधला आहे. महापालिका निवडणुकीतही मनसे आणि राष्ट्रवादी अशीच सरळ लढत रंगली होती. त्यात मनसेने मुसंडी मारल्याने ही घोडदौड रोखण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे बोलले जात आहे.

ठाणे, नवी मुंबईत महापौरपद ओबीसीसाठी - ठाणे आणि नवी मुंबईमध्ये महापौरपद ओबीसी, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये ओबीसी महिला यांच्यासाठी पद राखीव असेल. भिवंडी व धुळे येथे खुल्या गटातील महिलांसाठी राखीव राहील. मुंबईचे महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने यावेळी खुल्या सर्वसाधारण गटासाठीच्या आरक्षणात बदल होणार नाही. मुंबई,   उल्हासनगर, नागपूर आणि अहमदनगर महापालिकांचे महापौर हे महिलांसाठी राखीव होते. आता ही पदे खुल्या गटासाठी आरक्षित असून, त्यात बदल झालेला नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 9

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment