जाहिरात
Home >> Maharashtra >> North Maharashtra >> Nashik >> Nashik Doctor Get Patent On Santed Water

नाशिकच्या डॉक्टरला सुगंधी पाण्याचे पेटंट

धनंजय रिसोडकर | Jan 26, 2013, 06:08AM IST
 
 


नाशिक  - पिण्याच्या पाण्याला आवडत्या फळांचा किंवा फुलांचा सुगंध आला तर ...  असा विचार नाशिकचे डॉ. विक्रम काळे यांच्या मनात आला आणि त्या दृष्टीने त्यांनी संशोधनास प्रारंभ केला. या अभिनव कल्पनेचे पेटंट नुकतेच बौध्दिक संपदा विभागाकडून त्यांना मिळाले असून, भविष्यात अशा सुगंधी पाण्याचा प्रकल्प उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

जी बालके पाणी पिण्यास टाळाटाळ करतात त्यांना हे सुगंधी पाणी निश्चित आवडेल. हे पाणी त्यांच्या शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणारे आजार टाळण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच ते सर्वार्थाने नैसर्गिक पाणीच असल्याने बालकांना कोणताही अपाय होणार नाही, असा डॉ. काळे यांचा दावा आहे. आइस्क्रीम आणि आइसकँडीमध्ये या नैसर्गिक फळा-फुलांचा सुगंध असलेले पाणी वापरल्यास त्या सुगंधालादेखील अधिक पसंती मिळू शकते, असे काळे यांनी म्हटले आहे.

 

वाचकांचे विचार
 
 
Code:
9 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment