पुणे- निवडणुकीच्या काळात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा अविनाश बागवे याला पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली.
महापालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी प्रभाग क्रमांक 60 मधील अविनाश बागवे अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी कॉम्पलेक्स येथे मतदान केंद्र नको, अशी मागणी विरोधी उमेदवारांनी केली होती. त्यानंतर मतदान सुरू असताना या केंद्राजवळ कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी पांगवण्यासाठी आलेले पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. तर अविनाश बागवे याला मारहाण झाली असल्याची परिसरात अफवा पसरली होती. बागवे यांना तेथून जाण्याची विनंती निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांनी केली होती. परंतु, बागवे यांनी तेथून न जाता सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयागाने दिले होते. त्यामुळे पोलिसांनी अविनाश बागवे याला आज अटक केली आहे.