Home » Maharashtra » Kokan » Ratnagiri » For Mimcri Want Intelligency - Raj Advise Ajit Pawar

नक्कल करायला अक्कल लागते! - राज यांचा अजित पवारांना सल्ला

प्रतिनिधी | Feb 16, 2013, 12:50PM IST
नक्कल करायला अक्कल लागते! - राज यांचा अजित पवारांना सल्ला

खेड - अजित पवारांना नक्कल करायला कधीच जमणार नाही. नक्कल करायलादेखील अक्कल लागते. ते नेहमी गंभीर असतात कारण त्यांना सतत ‘मोजत’ बसायचे असते, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना लगावला.

राज नकलाकार असल्याची टीका पवार यांनी केली होती. शुक्रवारी खेडमधील सभेत राज यांनी त्यांचा चांगलाच
समाचार घेतला. अजित पवार पैशात, तर राणे जमिनीत मग्न आहेत, असा आरोप त्यांनी केला. कोल्हापूरच्या प्रचंड सभेनंतर कोकणातील खेडमधील सभेलाही नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

खेडमधील सभेत राज यांनी स्थानिक विकासाला प्राधान्य देत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. हा प्रकल्प वाईट असेल तर धुडकावून लावा.मात्र, याबाबत कोणी राजकारण करत असेल तर प्रकल्पाला विरोध करू नका. या प्रकल्पामुळे कोकणाचा विकास होणार असेल तर त्याला सकारात्म दृष्टीने बघा, असा सल्ला त्यांनी दिला. बांग्लादेशी घुसखोरांवर हल्ला बोल करत राज यांनी कोकणात अटक झालेल्या बांगलादेशी गुन्हेगारांची यादीच वाचवून दाखवली. कोकणातील शेती मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी स्थानीक नेत्यांनी आजवर प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे हा भाग मागासलेला राहिल्याचे ते म्हणाले.

कोकणाला केवळ ओरबाडलंय
‘कोकण आपला असा’ असे म्हणत कोकणात कोणीही घुसत आहे. कोकणातील निसर्गाला केवळ ओरबाडण्याचे काम सुरू आहे. येथे राजकीय नेत्यांची दहशत आहे. पर्यटन विकासाची कवेळ चर्चा होते. कुठलाही खासदार आणि आमदार जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे कोकणाला वाचवण्याची जबाबदारी जनतेवर आली आहे, असे राज यांनी नमूद केले. शिवसेना नेते व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

Email Print
0
Comment