Home » Maharashtra » Pune » Pandharpur Wari Live From Dyaneshwar Palkhi From Aalandi

www.warisantanchi.com ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण

प्रतिनिधी | Jun 11, 2012, 13:35PM IST
www.warisantanchi.com ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण

पुणे - मराठी संस्कृती, परंपरा आणि अध्यात्मिक विचार याचा मेरुमणी असणा-या पंढरपूरच्‍या वारीसाठी बनवण्‍यात आलेल्‍या www.warisantanchi.com हे संकेतस्थळ ज्ञानेश्‍वर महाराजांच्‍या चरणी अर्पण करण्‍यात आले. यावेळी सोहळयाचे मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, आळंदी देवस्‍थानचे प्रमूख विश्‍वस्‍त डॉ. शिवाजीराव मोहिते, डॉ. प्रशांत सुरू, सुधीर पिंपळे, श्‍यामसुंदर मुळे आणि राजाभाऊ रंधवे (चोपदार) हे उपस्थित होते. आळंदी देवस्‍थानच्‍या वीणा मंडपात हा कार्यक्रम पार पडला.

हे संकेतस्थळ मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात आले असून, त्या माध्यमातून ‘वेब वारीचे’ वारकरी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ 14 पानांचे असून त्यावर वारीचा इतिहास सांगितला आहे. तसेच वारीत घडणा-या दैनंदिन घडामोडी व छायाचित्रे त्यावर अपलोड केली जाणार आहेत. याबरोबरच पायी वारी व भजनामध्ये प्रचलित असलेल्या गायनाच्या पारंपरिक चाली जतन करण्याच्या दृष्टीने सदर भजनांच्या चालीचे ध्वनिमुद्रण करून सीडी तयार करण्यात आली आहे, त्‍याचेही यावेळी प्रकाशन करण्‍यात आले.

त्‍याचबरोबर पंढरपूर आषाढी पायी वारीत तरुणांचा सहभाग वाढावा तसेच त्यांच्या गुणदर्शनांना चालना देण्यात येणार आहे. या हेतूने शिवस्पर्श प्रतिष्ठान व वारकरी सेवा संघ यांच्या वतीने प्रज्ञेश मोळक यांच्या कॅमे-याने टिपलेल्या पायी वारीतील तीन हजार छायाचित्रातील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन आजपासून (सोमवार) ते 14 जूनदरम्यान पुण्यात भरविण्यात आले आहे.


हे पण वाचा
Email Print
0
Comment