Home » Maharashtra » Pune » Veshya Worker In Pune, Arrested

पुण्यात वेश्या व्यवसाय करणा-या दोघींना अटक

प्रतिनिधी | Dec 01, 2011, 03:00AM IST
पुण्यात वेश्या व्यवसाय करणा-या दोघींना अटक

पुणे - पश्चिम बंगालमधून फरार झालेली वेश्या व्यवसायातील दलाल पूजा शर्मा (वय 35, रा. बुधवार पेठ, पुणे) व रायदिघी येथील मायला तमांग (रा. बुधवार पेठ,पुणे) या दोघींना बुधवारी पोलिसांनी सापळा रचून अटक केली व अधिक चौकशीसाठी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोलकत्त्यात सेक्स रॅकेट चालविल्याचा गुन्हा दाखल असलेली पूजा तेथून फरार झाली होती. कोलकाता उच्च न्यायालयाने तिचा त्वरित शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार तेथील पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पुण्यातील बुधवार पेठेमधील वेश्यावस्तीमध्ये असलेल्या डिस्को इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर असलेल्या कुंटणखान्यात ती असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा घालून तिला अटक केली.

तमांग ही पश्चिम बंगालमधील रायदिघी येथून फरार झाली असून ती पुण्यात वेश्याव्यसाय करत असल्याचे पोलिसांना समजले. या माहितीवरून पोलिसांनी बुधवार पेठेत छापा टाकून कुंटणखान्यातून सदर महिलेस अटक केली.

अभिनेत्री पद्मजाला तीन दिवस कोठडी

अनेक मराठी चित्रपट, नाटकात झळकलेली अभिनेत्री पद्मजा बापटसह अन्य दोघींना मंगळवारी पुण्यात वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली होती. बुधवारी तिला न्यायालयाने तीन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर अन्य दोघांना जामीन मंजूर केला आहे.

Email Print
0
Comment