सिद्दिकीच्या मृत्यूची जनतेतूनही चौकशी
प्रतिनिधी
| Jun 28, 2012, 03:30AM IST

पुणे - इंडियन मुजाहिद्दिनचा सदस्य असलेल्या मोहंमद कातिल मोह्ममद जाफिर सिद्दिकी (वय 32, रा.दरभंगा, बिहार) याचा ता. आठ जून रोजी येरवडा कारागृहात शरद मोहोळ व अलोक भालेराव यांनी खून केला होता. या खूनाची चौकशी करण्यासाठी 29 जून रोजी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून माहिती घेतली जाणार असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र कुलकर्णी यांनी बुधवारी पत्रकाद्वारे जाहीर केले.
ज्या व्यक्तींना सिद्दीकीच्या मृत्यूबाबत माहिती द्यावयाची असेल त्यांनी लेखी अथवा तोंडी
पुरावा देण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय दंडाधिका-यांना भेटावे, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





