यवतमाळ: शिवसेनेच्या येथील खासदार भावना गवळी यांच्या घरात घुसून शिवसेना पदाधिका-यांनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी घडली. भावना गवळी यांना सभेसाठी बोलावूनही त्या न आल्याने आपला पराभव झाल्याच्या समजातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे.
महिला आघाडी जिल्हाप्रमुख सागर पुरी यांचा पंचायत समितीत 10 मतांनी पराभव झाला. काही कार्यकर्त्यांसह त्यांनी गवळी यांच्या घरी जाऊन बाचाबाची केली. या वेळी मारहाणीचाही प्रकार झाला. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.