जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur >> Baby Girl Murder At Nagpur By Her Mother

माता न तू वैरीणी: आईनेच चिरला पोटच्या मुलीचा गळा

दिव्य मराठी वेब टीम | Jun 28, 2012, 16:29PM IST
 
 


नागपूर: माता न तू वैरीणी! या विधानाचा गुरूवारी नागपुरात प्रत्यय आला. जन्मदात्या मातेनेच पोटच्या मुलीची गळा चिरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शिला भाके असे आरोपी महिलेचे नाव असून ती  फरार आहे. पोलिस तिचा शोध घेत आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत मुलीचे नाव वैशाली असे असून ती आणि तिचा मोठा भाऊ घरी होता. ते दोघे झोपले होते. तेव्हा त्याच्या आईने मोठ्या सुरीने वैशालीवर हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्याचे वडील घरी नव्हते. वडील घरी आल्यानंतर त्याने त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी पोलिसांना कळविले.

आरोपी शिला भाके हिला अधूनमधून वेडसरपणाचे झटके येत असल्याची माहितीही समोर आली आहे. या वेडेपणाच्या भरातच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.



 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
8 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment