नागपूर - भारतीय जनता पक्षचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे पूत्र सारंग यांचा रविवारी (२४ जून) येथील राजवाडा पॅलेस महलमध्ये शाही विवाह सोहळा झाला. या समारंभाला भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते हजर होते. त्या बरोबरच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनीही वधुवरांना शुभ आशीर्वाद दिले.