जाहिरात
 
 
 

एसटी-मिनीबस अपघात; 80 जखमी, 6 जण गंभीर

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 04:41(21/02/12)
 
 
 

चिखली - बुलडाणा-मलकापूर राज्य मार्गावरील राजूरघाट परिसरात सोमवारी दुपारी एसटी व मिनीबसची समोरासमोर धडक होऊन  80 प्रवासी जखमी झाले. यापैकी  सहा जण गंभीर असून त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  

बुलडाण्याहून मलकापूरकडे जाणा-या एसटी बसने (एमएच 20-बी-8093) समोरून येणा-या मिनीबसला (एमएच 06-एस-7896) जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही बसमधील 80 प्रवासी जखमी झाले. या अपघातात संदीप सुरेश पुंगळे (वय 22, जाफराबाद) हे किरकोळ जखमी झाले आहेत, तर सखुबाई जगदेव धुरंधर (55), मथुराबाई गुंडे (60), अमोल संभाजी भुतेकर (18), साखराबाई साहेबराव पडोळ (55), सुनील हळपे, संगीता भिकुलाल वैष्णव (22) गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये चिखली आगाराचे चालक एम.बी.थुटे, एस.पी.पाटील, जळगाव जामोद आगाराचे चालक एस.पी.हाडपे, वाहक पी.पी. दराडे यांच्यासह भीमराव इंगळे (इसरुळ), मयूर भिका वैष्णव, सोनू  वैष्णव (अजिंठा), संकेत तपकर (गुंज), लक्ष्मण कुटे (कोठळी), शेख तस्लीम शेख बबू (कोथळी), जलीमा बी शेख बबीर (भादोला) यांचा समावेश असून त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment