Home » Maharashtra » Vidarva » Nagpur » Engineering Student Suicide In Nagpur

इंजिनिअरिंग विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रतिनिधी | Aug 10, 2012, 01:29AM IST

नागपूर - इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षात शिकणा-या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या तिस-या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूर येथे गुरुवारी घडली. रेखा सिंग असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या दुस-या वर्षात शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने तिच्या वडिलांना एसएमएस करून ‘आय अ‍ॅम सॉरी’ असे म्हटले आहे. या मुलीचे वडील हे एका खासगी कंपनीत काम करतात. या घटनेचा पोलिस तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Email Print
0
Comment