Home » Maharashtra » Vidarva » Nagpur » Human Trafficking In Akola One Arrest

अकोल्यात तरुणीची खरेदी करताना औरंगाबादच्या एकाला अटक

दिव्य मराठी वेब टीम | Feb 10, 2013, 14:38PM IST
अकोल्यात तरुणीची खरेदी करताना औरंगाबादच्या एकाला अटक

अकोल - तरुणीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या एकाला येथील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी अटक केली आहे. ह्युमन ट्रॅफिकिंगचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

औरंगाबादहून आलेल्या शामद पटेल याने ३७ लाखांमध्ये तरुणीचा सौदा पक्का करुन तिची खरेदी केली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शामद पटेल याला अटक केली आहे. पटेल हा औरंगाबादचा रहिवासी असून तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. हे प्रकरण संवेदनशिल असल्याने पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

Email Print
0
Comment