अमरावती: राज्यातील 10 महापालिका निवडणुकीच्या काळात अमरावतीमध्ये सापडलेले एक कोटी रुपये प्रकरणी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार रावसाहेब शेखावत यांची पोलिस आयुक्तांकडून ही चौकशी सुरू आहे. परंतु, हे एक कोटी रूपये पक्षनिधी असल्याचे रावसाहेब शेखावत यांनी यापूर्वी सांगितले होते आणि आजही ते आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्य माणिकराव ठाकरे यांनी देखील या प्रकरणी खुलासा दिला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारीयांनी आमदार शेखावत यांना यापूर्वी नोटिस बजावली होती.
निवडणुकीच्या काळात अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी फोर्ड गाडीतून एक कोटी रूपयांची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी चौकशी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्य नारायण यांनी यापूर्वी सांगितले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशयही व्यक्त केला जात होता. याप्रकरणी राजेंद्र मुळक आणि अग्रवाल यांनाही बोलविण्यात आले आहे.