Home » Maharashtra » Western Maharashtra » Ahmednagar » Ahmednagar Art And Culture Issue

..इथे घडेल परंपरा आणि आधुनिक कलासंस्कृतीचा मिलाप!

प्रतिनिधी | Feb 23, 2013, 11:55AM IST
..इथे घडेल परंपरा आणि आधुनिक कलासंस्कृतीचा मिलाप!

नगर- परंपरा आणि आधुनिक कलासंस्कृतीचा मिलाप घडवणार्‍या नगरमधील 18 कलावंतांच्या कलाकृती बघण्याची संधी नगरकरांना मिळणार आहे. आकार ग्रुपतर्फे महावीर कलादालनात भरवण्यात येणारे हे प्रदर्शन 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले असेल.

तक्षशिला विद्यालयात इयत्ता दुसरीत शिकणारी जारंगल सहिरा या चिमुकलीपासून जगदीश सदाशिव खरमाळे, भालचंद्र दत्तात्रेय जगनाडे, विजय शशिकांत कुलकर्णी या ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील कलावंत मंडळी या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. त्यात प्रियंका रवींद्र सातपुते, मनोरमा जीवन गारडे, जावेद हबीब शेख, महेश ज्ञानेश्वर ताकपेरे, विकास प्रकाश कांबळे, प्रमोद भागीनाथ जगताप, मेहेर राजाराम वंगार, बालाजी भैरवनाथ वल्लाल, नंदकुमार विश्वनाथ पगारे, अरविंद जे. कुडिया, दत्तात्रेय किसनराव आडेप, सुदेश चंदर छजलाने, सखाराम सावळेराम थोरात, दीपक जगन्नाथ गोंधळे आदींचा समावेश आहे.

चित्र, छायाचित्र व शिल्पकला यांचा सुरेख संगम या प्रदर्शनात अनुभवता येईल. प्रियंका सातपुते, महेश ताकपेरे यांची छायाचित्रे; बालाजी वल्लाल यांनी टाकाऊ वस्तू वापरून तयार केलेली शिल्पे, सुदेश छजलाने यांची खडूशिल्पे प्रदर्शनाला वेगळी परिमिती प्राप्त करून देतील. मॉडर्न आर्टचा आविष्कार कुडिया, खरमाळे, आडेप, पगारे यांच्या चित्रांत पहायला मिळेल.

या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे विविध कलावंतांची प्रात्यक्षिके इथे होणार आहेत. 24 ला सकाळी 11.30 वाजता नवनाथ चोभे यांचे तैलरंगातील पोट्रेट, सायंकाळी 4.30 वाजता नुरील भोसले, 25 ला सकाळी 11.30 वाजता प्रतिमकुमार कसबेकर यांचे पेन्सिल रेखाटन, सायंकाळी 4.30 वाजता र्शीधर अंभोरे यांचे रेखाचित्रांचे प्रात्यक्षिक, 26ला सकाळी 11.30 वाजता प्रमोद जगताप यांचे मॅट पेंटिंग व सायंकाळी 4.30 वाजता विकास कांबळे यांचे शिल्पकलेचे प्रात्यक्षिक सादर होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन श्यामजी पटेल व वसंतलाल बोरा यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बिल्डर असोसिएशचे उपाध्यक्ष जवाहर मुथा असतील. यावेळी चित्रकार श्रीधर अंभोरे, प्रमोद कांबळे, अनुराधा ठाकूर, अविनाश पडवळ, विजय कळमकर आदी उपस्थित राहणार आहेत.

Email Print
0
Comment