जाहिरात
Home » Maharashtra » Western Maharashtra » Ahmednagar » Making Engine In Nagar Use In Non Man Helicoptor

नगरमध्ये बनवलेल्या इंजिनाची मानवरहित विमानात यशस्वी चाचणी

प्रतिनिधी | Feb 15, 2013, 09:45AM IST
नगरमध्ये बनवलेल्या इंजिनाची मानवरहित विमानात यशस्वी चाचणी

नगर- लष्कराच्या येथील ‘वाहन अनुसंधान तथा विकास आस्थापना’ (व्हीआरडीई) संस्थेत तयार केलेल्या रोटरी इंजिनाची मानवरहित विमान ‘निशांत’मधील चाचणी यशस्वी चाचणी झाली. कर्नाटकातील कोलार येथे 22 व 24 जानेवारीला या चाचण्या झाल्या. तीन तासांपेक्षा अधिक काळ या इंजिनाने आपली क्षमता सिद्ध केली. त्यामुळे ‘व्हीआरडीई’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मानवरहित विमानासाठी तयार करण्यात आलेले हे पहिलेच संपूर्ण भारतीय बनावटीचे इंजिन आहे. 30 किलो वजन असलेल्या या इंजिनाची क्षमता 55 हॉर्सपॉवर आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ‘रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन’चा भाग असलेल्या येथील ‘व्हीआरडीई’तील तंत्रज्ञांनी अथक परिश्रम घेऊन हे इंजिन तयार केले. या इंजिनाने चाचणीदरम्यान ‘निशांत’ या मानवरहित विमानाला समुद्रसपाटीपासून 3700 मीटर उंचीपर्यंत अतिशय सहजपणे नेले. अपेक्षित सर्व चाचण्या इंजिनाने लीलया पार करीत आपली क्षमता सिद्ध केली. हे इंजिन तयार करणा-या  पथकामध्ये मराठी तंत्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. व्हीआरडीईचे संचालक मनमोहनसिंग यांनी हे इंजिन तयार
करणा-या  पथकाचे प्रमुख तंत्रज्ञ डी. राधाकृष्णन व इतरांचे अभिनंदन केले.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
3 + 10

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment