जाहिरात
 
 
 

251 कोटी रुपये गेले ‘पाण्यात’

 
Source: महेश पटारे   |   Last Updated 05:29(23/02/12)
 
 
 

नगर - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नागरी व ग्रामीण योजना विभागांच्या 19 पैकी 18  ग्रामीण पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. काही योजनांचे काम झालेले असले, तरी जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे त्यांचे हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे या योजनांपायी आतापर्यंत खर्च झालेले सुमारे 251 कोटी रुपये अक्षरश: ‘पाण्यात’ गेले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नागरी-ग्रामीण योजना विभागाच्या वतीने जिल्ह्यात 19 पाणीयोजना राबवण्यात आल्या आहेत. या योजनांतर्गत 242 गावे व 273 वाड्यांना पाण्याची सोय करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनांवर जानेवारी 2012 पर्यंत एकूण 251 कोटी 20 लाख 33 हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या उदासीनतेमुळे काही योजनांचे अद्यापि हस्तांतरणच करण्यात आलेले नाही.

राहाता तालुक्यातील लोणी व आडगाव या योजनेंतर्गत काही काम पूर्ण झाले आहे. लोकवर्गणीसाठी पाठपुरावा सुरू असून सुधारित योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. पूरक पिंप्री योजनेच्या शेरापूर्ततेचे काम सुरू आहे. कोल्हार व भगवतीपूर योजनेचे काम पूर्ण झाले आहे. ही योजना ग्रामपंचायत चालवते. त्यांनी वाढीव वितरण व्यवस्था व साठवण तलावाची मागणी केली आहे. शेवगाव तालुक्यातील हातगाव योजनेचे काम मंद गतीने सुरू असून हे काम करणा-या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर, घुमनदेव योजनाही रखडली आहे. या योजनेच्या उर्वरित कामासाठी ठेकेदाराने पाइपची मागणी केली आहे. गळनिंब योजनेचे काम झाले असले, तरी ठेकेदार प्रतिसाद देत नसल्याने त्याच्यावर कारवाई सुरू केली होती. आता मात्र पुन्हा एकदा त्याला संधी देण्याचे ठरले आहे.

बुºहाणनगर योजना पूर्ण झाली असून तिची वर्षभर चाचणी घेण्यात आली. या योजनेतील नऊ गावांची हस्तांतरणपूर्व पाहणी झाली आहे. मात्र, 213.78 लाख पाणीपट्टी व 75 लाख वीज थकबाकीमुळे योजना बंद आहे. अद्यापि ही योजना जिल्हा परिषदेने ताब्यात घेतलेली नाही. मिरी-तिसगाव योजनाही बंदच आहे.  या योजनेची विजेची 38.80 लाख थकबाकी आहे. बैजू बाभूळगाव योजना मिरी-तिसगाव योजनेवर अवलंबून असल्याने तीदेखील बंदच आहे.

नेवासे तालुक्यातील रांजणगाव योजनेची कार्यवाही न्यायालयीन निकालानुसार सुरू आहे. पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार योजना 66.42 लाखांच्या वीज थकबाकीमुळे बंद आहे. ही योजना हस्तांतरित करून घेण्यास जिल्हा परिषद उदासीन आहे. कर्जत तालुक्यातील आखोणी व निमगाव गांगर्डा या योजनांमधून गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता, परंतु   या योजनाही जिल्हा परिषदेने हस्तांतरित करून घेतल्या नाही. देखभाल दुरुस्तीला निधी नसल्याने या दोन्ही योजना बंद आहेत.

पारनेर तालुक्यातील भाळवणी व वासुंदे योजनेंंतर्गत येणा-या सर्व गावांनी भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही योजना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील चांदा योजनेचे काम पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहे. शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी योजनेची चाचणी सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील डोंगरवाडी योजनेचे काम पूर्ण झाले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
5 + 4

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment