जाहिरात
 
 
 

सातशे ग्रॅम वजनाच्या बाळाचे प्राण वाचवले

 
Source: प्रतिनिधी   |   Last Updated 01:51(23/02/12)
 
 
 
विज्ञापन

सातारा - 32 व्या वर्षी बाळाची आई होण्याची अखेरची संधी लाभलेल्या अनुमिता चौधरी या महिलेने आठ महिन्यांतच बाळाला जन्म दिला खरा; परंतु या चिमुकल्याचे वजन होते केवळ 700 ग्रॅम. मात्र पुणे येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत या बाळाचे प्राण वाचवले.  डॉ. अनिल चिटके यांनी सांगितले की, औषधोपचार व तपासणी नियमित सुरू असूनही पाचव्या महिन्यात रक्तदाब वाढल्याने गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी होऊ लागला. अशा वेळी बाळाला वाचवण्यासाठी लोकर सेगमेंट सिझिरियन सेक्शन शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. बाळाच्या सर्व अवयवांची अपूर्ण वाढ झाल्याने त्याला श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे शस्त्रक्रिया करुन बाळाला रुग्णालयातील अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभागात हलवले. त्याच्या श्वसनासाठी फुप्फुसात आवश्यक ती यंत्रणा कार्यान्वित करून बाळाच्या वाढीसाठी कृत्रिमरीत्या वातावरण निर्माण करण्यात आले. आठपेक्षा जास्त दिवस हे बाळ व्हेंटिलेटरवर ठेवून नवव्या दिवसापासून हे बाळ श्वास घेऊ लागले. नंतर त्याचा अन्नपुरवठा हळूहळू वाढवला गेला.  35  दिवसांपर्यंत या बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. नियमित अल्ट्रासाउंड स्कॅनिंगमुळे त्याच्या मेंदूची वाढ योग्य होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
9 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment