जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur >> Sadashivrao Mandlik Sugar Factory Election Kolhapur

मंडलिक, मुश्रीफांच्या तोफा थंडावल्या, कारखान्यासाठी आज मतदान

प्रतिनिधी | Jun 12, 2012, 06:41AM IST
 
 


कोल्हापूर - सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवार दि. 12 जून रोजी मतदान होत आहे. खासदार सदाशिवराव मंडलिक विरूध्द कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची आघाडी असे या लढतीचे स्वरूप आहे. मंडलिक आणि मुश्रीफ राष्ट्रवादीत एकत्र असताना दोघांनी या कारखान्याची स्थापना केली होती. सहा वर्षांपूर्वी मंडलिक आणि मुश्रीफ वेगळे झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत या दोघांकडून आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडवला जातो. हे दोघेही वेगळे झाल्यानंतर झालेली कारखान्याची पहिली निवडणूक मंडलिक गटाने जिंकली. आता दुसरी निवडणूक मंगळवारी होत आहे. मंडलिक यांनी सूडाचे राजकारण सुरू केल्याने त्यांना सभासद जागा दाखवतील असा विश्वास मुश्रीफ व्यक्त करत आहेत. तर सत्ता मिळाली तर मुश्रीफ कारखान्याचे पत्रेही विकून खातील असा आरोप मंडलिक यांनी केला आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
7 + 8

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment