जाहिरात
 
 

निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर नगरसेविका देतेय बारावीची परीक्षा

 
Source: दिव्य मराठी वेब टीम   |   Last Updated 18:05(21/02/12)
 
 
 
 
 

सोलापूर - नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत  निवडून आलेल्या नगरसेविका महादेवी अलकुंटे यांनी आज १२वीची परीक्षा दिली.

आजपासून १२वीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. सकाळी ९-३० वाजता पासूनच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी परीक्षा केंद्रावर येण्यास सुरुवात केली.  पहिलाच दिवस असल्यामुळे आसन क्रमांक कुठे आहे. कोणत्या मजल्यावर आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

१२वीची परीक्षा म्हणजे पुढील आयुष्याचा टर्निंग पॉईंट असल्यांने पालकांबरोबर विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असते.

छत्रपती शिवाजी प्रशाला या परीक्षा केंद्रावर नुतन नगरसेविका महादेवी अलकुंटे यांनी आज परीक्षा दिली. विद्यानगर प्रभाग क्रमांक ३६ मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांनी महापालिकेची निवडणूक लढविली होती. यात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनिता धोत्रे यांचा ५०४ मतांनी पराभव केला आहे.

महापालिकेच्या परीक्षेत पास होऊन राजकीय आयुष्यात पुढे जात असतांना  शैक्षणिक आलेखही चांगला असला पाहिजे आणि महापालिकेचा कारभार करतांना या शिक्षणाचाही फायदा होईल या उद्देशानेच परीक्षा देत असल्याचे त्यांनी सांगितले. लग्नानंतर कौटुंबीक जबाबद-यांमुळे शिक्षणात व्यतय आला होता, मात्र आता पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे. निवडणूकीत यश मिळविले तसेच १२वीच्या परीक्षेतही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परीक्षेचा आणि निवडणूकीचा काळ एकच असतांना त्याचा १२वीच्या अभ्यासावर काही परीणाम झाला नाही का, असे विचारले असता त्यांनी १२वीची तयारी आधीपासूनच करत असल्याचे सांगितले.

छायाचित्र - संदीप वाडेकर

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
आपके विचार

नहीं दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

दिखाया जायेगा

कोड :
10 + 3

 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment