जाहिरात
Home » Maharashtra » Western Maharashtra » Solapur » Marathi Bhasha Din Celebrate In Sansad

‘मराठी दिनी संसदेत मराठीतूनच बोलावे’

प्रतिनिधी | Feb 24, 2013, 08:51AM IST
‘मराठी दिनी संसदेत मराठीतूनच बोलावे’

सोलापूर - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात येतो. त्यादिवशी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत मराठीतून बोलावे, असे आवाहन शिवसेनेचे राज्यसभा सदस्य डॉ. भरतकुमार राऊत यांनी केले आहे.

लोकसभेतील 48,राज्यसभेतील 19 व नामनिर्देशित पाच असे एकूण 72 खासदार महाराष्ट्रातून संसदेत प्रतिनिधित्व करतात. त्या सर्वांनी निदान एक दिवस तरी मराठीतून भाषण करावे, असे सर्वांना आवाहन आहे. त्यासाठी सर्वांना लेखी पत्रे पाठवली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा राऊत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. मराठी भाषा दिनानिमित्त आपण हे आवाहन केले आहे. मराठी भाषा ही तशी शेड्युल्ड भाषा असल्यामुळे संसदेत मराठीतून भाषण करता येऊ शकते. मात्र त्यासाठी खासदारांना एक दिवस अगोदर ‘आपण मराठीतून बोलणार आहोत’ अशी नोटीस द्यावी लागते. ती त्यांनी द्यावी, असेही आवाहनही राऊत यांनी केले आहे.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
10 + 8

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment