Home » National » Gujarat » Asaram Bapu Narayan Sai Sexual Harrassment Case Latest News

आसाराम बापूंना पोलिस कोठडी; नारायण साईच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली

भास्कर न्यूज नेटवर्क | Oct 15, 2013, 16:09PM IST
1 of 4

अहमदाबाद/जोधपूर- अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडलेले स्वयंघोष‍ित अध्यात्मिक संत आसाराम बापू आणि त्यांचा मुगला नारायण साई यांच्या मागील शुक्लकाष्ट सुटण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीयेत. अहमदाबाद पोलिसांनी आसाराम यांना गांधीनगर कोर्टात आज (मंगळवारी) हजर केले. सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने त्यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र असाराम यांचा मुलगा नारायण साई याच्या अटकपूर्व जामीन अर्जावलील सुनावणी ठळली असून ती येत्या 17 ऑक्टोंबरला होणार आहे.

यापूर्वी, सुरतमध्ये झालेल्या दुष्कर्माप्रकरणी तपास अधिकार्‍यांनी सोमवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत आसाराम यांची चौकशी केली होती. जवळपास अडीच तास चाललेल्या चौकशीत आसाराम यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. आसाराम म्हणाले, पीडि़त तरुणीचे नाव ते पहिल्यांदाच ऐकत आहेत. याप्रकरणी आज त्यांची जबाब नोंदविला जाणार आहे. आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप ही राजकार्‍यांचे षडयंत्र असल्याचेही आसारामांनी म्हटले आहे.

Email Print
0
Comment