जाहिरात
Home » National » Other State » Kedarnath Tempal In Flood

केदारनाथ मंदिराला तडे, पवित्र गाभारा मात्र सुरक्षित

वृत्तसंस्था | Jul 17, 2013, 07:13AM IST

नवी दिल्ली - पवित्र केदारनाथ मंदिराला पाऊस आणि पुरामुळे तडे गेले आहेत, सुदैवान गर्भगृह मात्र सुरक्षित आहे, असा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पुरातत्व विभागाने केलेल्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या नैसर्गिक संकटात दरड कोसळून हे तडे गेले आहेत, असे दिसून आले आहे. 11 जुलै रोजी विभागाच्या तीन सदस्यीय टीमने मंदिराची पाहणी केली होती. त्यानंतर या चमूने दिल्लीतील उच्चाधिकार्‍यांना आपला प्राथमिक अहवाला सोपवला. गाभार्‍याला मात्र फारसे तडे गेलेले नाहीत, असे डेहराडूनच्या पुरातत्व सर्कलचे अधीक्षक अतुल भार्गव यांनी सांगितले. मंदिराच्या पूर्वेकडील सभा मंडपाचे अधिक नुकसान झाले आहे. पुरात इशान मंदिर पूर्णपणे वाहून गेले होते. पाषाणाचे असंख्य दगड पश्चिम द्वाराकडून बाहेर पडलेली दिसून येतात. परंतु जोपर्यंत ढिगारे हटवण्याचे काम केले जात नाही. तोपर्यंत सर्व परिस्थिती लक्षात येणार नाही. हे ढिगारे 2 ते 6 फुटांचे आहेत. दरम्यान, हा प्राथमिक अहवाल आहे. तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल, असे पुरातत्व विभागाच्या टीमचे प्रमुख डॉ. बी.आर. मणी यांनी स्पष्ट केले.

BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 10

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment