जाहिरात
Home >> National >> Delhi >> Ambedaker-May-Replace-Gandhi-On-Banks-Notes

नोटांवर दिसणार बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज !

दिव्‍य मराठी वेब टीम | Jun 17, 2012, 13:27PM IST
 
 


नवी दिल्‍ली- रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडिया आता नोटांवर महात्‍मा गांधींच्‍या प्रतिमेशिवाय इतर महत्‍वाच्‍या व्‍यक्‍तींची प्रतिमा छापण्‍याचा विचार करीत आहे. यामध्‍ये घटनेचे शिल्‍पकार भीमराव आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.

देशातील महान नेत्‍यांच्‍या योगदानाचे सदैव स्‍मरण व्‍हावे यासाठी त्‍यांचे नाव एखाद्या योजनेला दिले जाते. त्‍यासाठी त्‍यांचे नाव, चित्र किंवा मूर्तीचा वापर केला जातो. त्‍यामुळे ते लोकांच्‍या स्‍मरणात राहतात आणि प्रेरणा देतात.

जवळपास सर्व क्षेत्रात या महापुरूषांना स्‍थान देण्‍यात आले आहे. परंतु, आतापर्यंत नोटांवरच यांना स्‍थान मिळाले नव्‍हते. फक्‍त महात्‍मा गांधींचाच फोटो नोटेवर पाहायला मिळतो. रिझर्व्‍ह बँक ऑफ इंडियाला अनेक लोकांनी महात्‍मा गांधींशिवाय इतरांचीही प्रतिमा यावर यावी यासाठी सुचवले आहे. महात्‍मा गांधींशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच दोन माजी पंतप्रधानांच्‍या नावाची शिफारस केली आहे. यामध्‍ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा समावेश आहे.

याआधी महात्‍मा गांधींचीं प्रतिमा नोटेवर येण्‍यापूर्वी अशोक स्‍तंभाच्‍या शिलालेखाच्‍या चित्राला स्‍थान देण्‍यात आले होते. वर्ष 1987मध्‍ये पहिल्‍यांदा महात्‍मा गांधी यांची प्रतिमा 500 रूपयाच्‍या नोटवर आणि 1996 नंतर सर्व नोटांवर दिसू लागली.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
8 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment