Home » National » Delhi » Anganwadi Sevika Salary Hike

अंगणवाडी सेविकांचे मानधन दुपटीने वाढले

वृत्तसंस्था | Jul 01, 2011, 04:26AM IST

नवी दिल्ली - एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एक एप्रिलपासून दुपटीने वाढ करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, सेविकांना 3, तर सहायकांना दीड हजार रुपये मानधन देण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने शिक्कामोर्तब केले आहे. सरकारला यामुळे 3 हजार 479 कोटी रूपयांचा बोजा सहन करावा लागणार असून यात राज्याचा वाटा केवळ दहा टक्के इतका असणार आहे. सर्व राज्यांना याची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Email Print
0
Comment