Home » National » Delhi » Aspiring Delhi Model Murdered

अभिनेता-मॉडेलची हत्‍या, मृतदेह मिळाला सुटकेसमध्‍ये

वृत्तसंस्‍था | Feb 24, 2013, 09:55AM IST
अभिनेता-मॉडेलची हत्‍या, मृतदेह मिळाला सुटकेसमध्‍ये

नवी दिल्‍ली- दिल्‍लीतील उदयोन्‍मुख मॉडेल आणि छोटया पडद्यावरील अभिनेत्‍याच्‍या हत्‍येचे प्रकरण समोर आल्‍यामुळे खळबळ उडाली आहे. सुमीत तिवारी (वय 21 वर्षे) या अभिनेत्‍याचा मृतदेह शनिवारी त्‍याच्‍या मित्राच्‍या घरी आढळून आला. दोन दिवसापूर्वीच सुमीतचे अपहरण झाले होते.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, सुमीतचा मृतदेह त्‍याचा मित्र शांती वर्माच्‍या घरी सुटकेसमध्‍ये मिळाला. मृतदेहावर जखमांचे व्रण आहेत. उल्‍लेखनीय म्‍हणजे या घटनेनंतर वर्मा फरार झाला आहे. सुमीत आपल्‍या मित्राच्‍या घरी भाडयाने राहत होता. शांती वर्मा चित्रपट आणि टीव्‍ही मालिकांसाठी पटकथा लिहिण्‍याचे काम करतो.

सुमीत 21 फेब्रुवारीपासून पूर्व दिल्‍लीतून बेपत्ता झाला होता. सुमीतचे वडील रामेश्‍वर तिवारी यांना सुमीतच्‍या सुटकेच्‍या बदल्‍यात 2 लाख रूपयांची खंडणी मागण्‍यात आली होती. खंडणीसाठी फोन आल्‍यानंतर त्‍यांनी पोलिसांमध्‍ये तक्रार नोंदवली होती. सुमीतने तीन महिन्‍यापूर्वीच नोएडा ये‍थील एका खासगी संस्‍थेत अभिनयाचा कोर्स पूर्ण केला होता.

एका चित्रपटाच्‍या शुटिंगसाठी सुमीत अक्षरधामला गेला होता. तेव्‍हापासून तो घरी परतला नव्‍हता. सुमीतचा मोबाईल फोनही तेव्‍हापासून बंद होता. त्‍यानंतरच सुमीतच्‍या सुटकेसाठी 2 लाखांची खंडणी मागण्‍यात आली होती.

Email Print
0
Comment