Home » National » Delhi » Attempt To Bug Vk Singh House?

माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंगांच्या घरी लष्कराकडूनच हेरगिरी?; मेजरला पकडले

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 18:03PM IST
1 of 3
नवी दिल्‍ली- माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, त्यांच्या घरी हेरगिरी करण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला.
माजी लष्करप्रमुखांच्या घरी लष्कराचा एक मेजर पकडण्यात आला असून त्याचे नाव आर. विक्रम सिंग आहे. तो लष्कराच्या सिग्‍नल कोर 1, सिग्‍नल यूनिटमध्ये तैनात आहे. मेजरने संशयास्पद हालचाली केल्यानंतर तेथील उपस्थित सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले व त्याच्याकडे चौकशी केली. याबाबतची माहिती मिळताच दिल्‍ली पोलिस आणि मिलिट्री पोलिस तेथे हजर झाली. दिल्‍ली पोलिसांनी मेजरला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर तेथे माध्यमांचे प्रतिनिधीही पोहचले आहेत. दरम्यान, पकडलेला मेजर कोणत्याही प्रकारची उत्तरे दिली नाहीत.
Email Print
0
Comment