Home » National » Other State » CERN DG Wants India As Associate Member

भारताने महाप्रयोगाचा सदस्य व्हावे

वृत्तसंस्था | Jan 07, 2013, 02:58AM IST
भारताने महाप्रयोगाचा सदस्य व्हावे

कोलकाता - गॉड पार्टिकल ‘हिग्ज बोसोन’चा शोध लावणा-या शास्त्रज्ञांना त्यांच्या या प्रयोगात भारताकडून सहकार्याची अपेक्षा आहे. या प्रयोगात भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारावी, असे मत युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चचे (सर्न) महासंचालक रोल्फ डाएटर ह्यूर यांनी व्यक्त केले आहे.

येथे आयोजित 100 व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. बिगबँग नावाने स्वित्झर्लंड व फ्रान्सच्या सीमेवर सुरू असलेल्या या जागतिक प्रयोगात भारताने सहकारी बनावे आणि यात योगदान द्यावे, अशी आमची अपेक्षा आहे.

त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे आग्रह धरला आहे. या मोहिमेचा सदस्य होण्यासाठी भारताला 60 कोटी रुपये (10 दशलक्ष स्विस फ्रँक) दरवर्षी द्यावे लागतील.

सदस्यत्वानंतर देशाचे फायदे
भारतीय शास्त्रज्ञांसाठी प्रयोगाचे नवे मार्ग खुले होणार. शिक्षणासंबंधी कार्यक्रमात भाग घेता येणार
महाप्रयोगासाठी घेऊ शकेल प्रशिक्षण. प्रयोगशाळेतही भाग घेता येणार. निर्णयासंबंधीच्या प्रकरणातही हस्तक्षेप करू शकणार
भारतीय कंपन्या सर्नसाठी मशीन निर्मितीत बदल करू शकतात.

Email Print
0
Comment