जाहिरात
 
 
 

रोज 10 सिगारेट ओढणा-यांनी सीटी स्कॅन करणे आवश्यक

 
Source: दिव्य मराठी नेटवर्क   |   Last Updated 01:31(23/02/12)
 
 
 

रायपूर (छग) - जगभरात विविध कारणांनी होणा-या कर्करोगापेक्षा धूम्रपानामुळे होणा-या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असून, सरकारे आणि विविध सामाजिक संस्था धूम्रपानाविरुद्ध जनजागृती करीत असूनही धूम्रपानाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे.

सिगारेट ओढणा-या व्यक्तीलाच नव्हे, तर त्याच्या कुटुंबीयांना व खासकरून लहान मुलांना निष्क्रिय धूम्रपानामुळे फुप्फुसांचे आजार होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. पक्षाघात, फुप्फुसे व मेंदूचा कर्करोग आणि हृदयविकारास आळा घालण्यासाठी हा सल्ला देण्यात आला आहे. रायपूरमधील डॉ. आंबेडकर रुग्णालयाच्या कॅन्सर संशोधन केंद्रात येणा-या रुग्णांपैकी 10 ते 15 टक्के रुग्ण धूम्रपान करणारे आढळून येतात. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार येथील डॉक्टर अशा रुग्णांचे समुपदेशन करण्यासाठी तयारी करीत आहेत.

सिगारेटमुळे कॅन्सरसह इतर रोग होण्याचा इशारा देऊनही धूम्रपान करणा-यांची संख्या वाढतच चालली आहे. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. प्रदीप चंद्राकर यांनी सांगितले की, एक सिगारेट ओढल्यास माणसाच्या रक्तात 0.35 मिलिग्रॅम निकोटिन जाते. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. याचप्रकारे रोज 10 सिगारेट ओढल्यास रक्तातील 3.5 मिलिग्रॅम निकोटिन जाते. त्यामुळे फुप्फुसांचा कॅन्सर, पक्षाघात आणि मेंदूचा कॅन्सर असे आजार होतात व ते व्यक्तीस लुळे-पांगळे करून टाकतात.

54 हजार लोकांवर संशोधन - कॅन्सरतज्ज्ञ डॉ. चंद्राकर यांनी सांगितले की, दररोज 10 सिगारेट ओढणा-या व्यक्तीस सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा फुप्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या डॉक्टरांनी धूम्रपान करणा-या 54 हजार लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.

सिगारेट ओढणा-या 27 हजार लोकांच्या छातीचे एक्सरे काढण्यात आले आणि बाकी 27 हजार लोकांचे सीटी स्कॅन करण्यात आले. सीटी स्कॅन केलेल्या रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये कॅन्सरचे निदान पहिल्या आणि दुस-या टप्प्यात असताना झाले, तर एक्सरेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरचे निदान शेवटच्या टप्प्यात असताना झाले आणि हे अतिशय धोकादायक आहे.

निकोटिनमुळे वाढते चिडचिड - रायपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. व्ही. सुदर्शन यांनी सांगितले की, सिगारेट ओढल्याने रक्तात निकोटिनचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे सिगारेट ओढणा-यास त्वचारोग आणि कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. रक्तात निकोटिनचे प्रमाण वाढल्याने व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा होतो आणि त्याच्या आजारी असण्याचा हाच पुरावा असतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
10 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment