जाहिरात
Home >> National >> Delhi >> Child-Sex-Abuse-In-Satyamev-Jayate

लांच्छनास्पद : हरिषवर ११ वर्षे सूरू होता बलात्कार

दिव्य मराठी वेब टीम | May 13, 2012, 15:08PM IST
 
 


नवी दिल्‍ली- 'सत्‍यमेव जयते' या आमिर खानच्‍या छोटया पडद्यावरील कार्यक्रमाने या आठवडयात आणखी एका गंभीर आणि सामाजिक मुद्याला समोर आणले. यावेळच्‍या भागात लहान मुलांच्‍या लैंगिक शोषणाच्‍या विषयास हात घालण्‍यात आला. वाचा लैंगिक शोषणाच्‍या अत्‍याचारास बळी पडलेल्‍या दोन दुर्दैवी मुलींची घटना...

या रविवारच्या भागात उत्तर प्रदेशातील अनामिकाची कथा आणि व्यथा मांडण्यात आली.  अनामिका ६ वर्षांची असतांना तिच्या शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण केले. अनामिकाने स्वतः हे सांगितले.  ती म्हणाली, 'त्या शिक्षकाने मला नको त्या जागी स्पर्ष केला. मी एवढी लहान होते की, तो काय करत आहे याची मला काहीच जाणीव नव्हती. शिक्षक आल्यानंतर माझे आई-वडील शिकवणीत व्यत्यय नको म्हणून दरवाजा बंद करुन घेत होते. त्यालाही तेच हवे असायचे आणि तो माझ्याशी जबरस्ती करत राहायचा. माझ्या घरच्यांच्या मनात त्याच्याबद्दल नितांत आदर होता. घरातील प्रत्येकांशी त्याने सलोख्याचे संबंध निर्माण केले होते. त्यामुळे घरच्यांना सांगावे की नाही या द्विधा मनःस्थितीत मी होते. कारण ते माझ्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवतील या बद्दल शंकाच होती. या घटनेमुळे मी मित्र-मैत्रिणींमध्ये जास्त मिसळत नव्हते. मी आत्मविश्वासच गमावून बसले होते. मला वाटत होते की माझ्यात काही करण्याची पात्रताच नाही.  मला सतत भीती वाटत राहायची की तो शिक्षक येईल की काय. ' २२ सदस्य असलेल्या घरात सात वर्ष अनामिका सोबत तो हे दुष्कृत्य करत होता.

 लहान मुलांचे लैंगिक शोषण करणारी व्यक्ती एकतर घरातील सदस्य असते किंवा कुटूंबातील लोकांची अतिशय जवळची असते.



मुंबईची सिंड्रेला प्रकाश



सिंड्रेला म्हणाली, अनेक जण हे लहानपणाच्या आठवणीत रमामन होतात. ते दिवस किती चांगले होते, ते दिवस पुन्हा यायला पाहिजे, असे बोलत असतात. पण मी, असा विचार नाही करत. मी माझ्या बालपणात परत जाऊ इच्छित नाही.  माझ्या आजोबांच्या वयाचे एक ग्रहस्थ होते. ते नेहमी आमच्या घरी येत जात असत. मी १२ वर्षांची असतांना माझ्या आईची प्रकृती बरी नसायची. तिला डायलसिसवर ठेवायचे. त्यामुळे कधी कधी मी घरी एकटीच असायचे. अशीच एकदा मी घरी एकटी होते. मी नवा ड्रेस घातला होता.

ते फ्लॉपी देण्याच्या निमीत्ताने घरी आले होते. बहुतेक ते त्यांचे नाटकच होते. त्यांनी माझ्या प्रत्येक अंगाला स्पर्ष करण्यास सुरुवात केली. माझ्या शरीरालाही ते सगळं नकोसं होत होतं. सुमारे अर्धातास त्यांच्या मनाला वाटेल तसे ते वागले. आर्ध्या तासानंतर मला जाणीव होऊ लागली की, माझे ओठ सुजले होते, त्यातून रक्त वाहात होते. कोणत्याच मुलीची इच्छा नसेल की, तिचे पहिले चुंबन असे असावे. त्यावेळी माझे वय १२ तर त्यांचे वय ५५ होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा ते माझ्या समोर येत, मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत राहायचे.  ते नेहमी घरी येत मात्र, मी स्वतःला खोलीत बंद करुन घेत होते. कुटूंबाशी बोलण्याची माझी हिम्मतच झाली नाही.

आई-वडीलांना हे कसं सांगवं तेच मला सुचत नव्हते. त्यानंतर परत दोन-तीन वेळेस त्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी पळून गेले.  चार वर्षांपूर्वी माझ्या आई जवळ मी ही सगळी हकिकत सांगितली, तेव्हा आईला धक्काच बसला. ती म्हणाली तू हे आधीच का नाही सांगितले.

मी आता त्या कटू अनूभवातून पूर्णपणे बाहेर आले आहे.  आता मला वाटते की, माझी त्यात काहीही चूकी नव्हती. चूक त्या माणसाने केली होती. आता मी त्यातून सावरले आहे.



हरिषसोबत ११ वर्षे झाला बलात्कार



'सत्यमेव जयते'च्या दुस-या भागात आलेल्या हरिष आय्यरने सांगितले की, 'माझ्या कुटूंबात माझे आई-वडील, लहान भाऊ, माझे दोन काका आणि काकू एवढे सदस्य होते. मी जेव्हा साडे सहा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या आईकडील नातेवाईकाने माझा बलात्कार केला. तो नेहमी आमच्या घरी येत-जात होता. एक दिवस तो मला आंघोळ घालत होता. तेव्हा घरात कोणीच नव्हते. याचाच त्याने गैरफायदा घेतला. त्यानंतर तो नेहमीच असे करायला लागला. मी जर मुलगी असतो तर नक्कीच मी गरोदर राहिलो असतो.  त्यानंतर तो त्याच्या सोबत इतरही काही लोकांना सोबत घेऊन येऊ लागला, आणि माझा बलात्कार करत होता. हे सगळं अतिशय घाणेरडं होतं.

नंतर नंतर मला त्याची भीतीही वाटत नव्हती आणि वाईटही वाटत नव्हते. जणू काही मी दगड झालो होतो. त्या काळात मी दोन आयुष्य जगत होतो. एक, जेव्हा माझे शोषण होत होते आणि दुसरे, जेव्हा मी एकटा असयाचो.  माझ्या आतमध्ये भयानक शांतता तर बाहेर अतिशय कल्लोळ सुरु होता. मला माणसांची भीती वाटायला लागली होती.  मी वर्गात बसल्या बसल्य अचानक उठून उभा राहात असे.



एकदा आमची पिकनिक गेली होती.  माझे सगळे मित्र कपडे काढून पाण्यात पोहायाला गेले. जेव्हा मी कपडे काढले तेव्हा मला ब्लिडिंग होत होते. मी लगचे पुन्हा कपडे घातले.

मी माझ्या आईला हे सगळे सांगण्याचा एकदा प्रयत्न केला होता. मात्र ते कोणत्या शब्दात सांगावे तेच मला सूचत नव्हते. मी आईला सांगितले की, तो मला नको तिथे हात लावण्याचा प्रयत्न करतो. मी आईला सांगितले मात्र तिचा विश्वास बसला नाही.  तेव्हा तो म्हणाला, बघीतले कोणाचाही विश्वास बसणार नाही. यानंतर जर कोणाला काही सांगितले तर मी तुझा जीव घेईल, आणि ज्याला सांगितले त्यालाही संपवून टाकेल.  मी आईला अनेक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ती समजूच शकली नाही. 

माझी आई मला समजू शकली नसली तरी, माझ्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने माझे दुःख जाणले होते. जेव्हा मी एकटाच रडत बसायचो तेव्हा तो माझे आश्रू पूसत होता. तो माझ्या जवळच बसून राहायचा. माझ्या जिम्मीनेच मला वाचवले.  माझ्या जिम्मीसोबतच चित्रपटांनीही माझी खूप मदत केली. श्रीदेवी माझी आवडती अभिनेत्री. तिचे चित्रपट पाहून मला जगण्याची प्रेरणा मिळत होती. सात वर्षांपासून सूरू झालेले हे दुष्कृत् सलग ११ वर्षे सूरू होते.'



अतिशय गंभीर विषय आहे



एका सर्व्हेक्षणानुसार देशभरातील ५३ टक्के लहान मुलांचे लैंगिक शोषण होते. याचा अर्थ प्रत्येक दोन मुलांमधील एक बालक या शोषणाचा बळी ठरत आहे.  त्यातील २१ टक्के प्रकरणे हे बलात्काराशी संबंधीत असतात.  या सर्व प्रकरणात केवळ मुलींचाच समावेश असतो असे नाही तर, लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या ५३ बालके ही मुलेच होती.



राही स्वयंसेवी सस्थेच्या अनुजा गुप्ता म्हणाल्या, पालकांनी आपल्या मुलांच्या बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांनी त्याच्या गा-हाण्यावर लक्ष दिले पाहिजे. कारण मुले अशा बाबतीत खोटे बोलत नाहीत.



कायदा काय सांगतो ?



लैंगिक शोषणाची शिकार ठरलेल्या देशभरातील मुलांसाठी १०९८ हा  हेल्पलाईन नंबर आहे. मात्र एक धक्कादायक गोष्ट ही आहे की, आपल्या देशात बालकांच्या लैंगिक शोषणाविरोधात कोणताही कायदा नाही.  लैंगिक शोषणापासून मुलांचे संरक्षण व्हावे असे एक विधेयक संसदेत (राज्यसभा) प्रलंबित आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment