Home » National » Delhi » Delhi Gang Rape Trial

दिल्ली गँगरेप पोलिसांचा बेजबाबदारपणा ; कलम ३०२ लिहण्यास विसरले !

दिव्य मराठी वेब टीम | Jan 06, 2013, 09:33AM IST

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह देशाला शर्मेने मान खाली घालायला लावणा-या दिल्ली गँगरेप प्रकरणात पोलिसांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. ३ जानेवारी रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात हत्येचे कलम लावण्यात आले मात्र, आरोपपत्राच्या कव्हरपेजवर ३०२ कलमाचा उल्लेख करण्यास पोलिस सपशेल विसरुन गेले. शनिवारी पोलिसांकडून मेट्रोपॉलिटन न्यायालयाकडे 'टाईपो एरर' मुळे हे कलम टाकायचे राहून गेले. ते सुधारण्याची संधी द्यावी, असा उल्लेख करत अर्ज केला. मात्र कोर्टाने नकार दिला आहे. सरकारी वकील राजीव मोहन म्हणाले, आम्ही चुक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता. हे टायपोग्राफिकल एरर होते. कोर्टाने अर्जाची काही गरज नसताना म्हटले आहे की, आरोपपत्रात ते कलम सविस्तर आले आहे. त्यासाठी वेगळ्या अर्जाची आवश्यकता नाही.

Email Print
0
Comment